गृह मंत्रालय
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, विश्वभारती आणि शांती निकेतन नेहमीच भारतात आणि परदेशात आकर्षणाची केंद्रे राहिली आहेत- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
“विश्वभारतीला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या संकल्पनांना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे”
Posted On:
20 DEC 2020 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, विश्वभारती आणि शांती निकेतन ही नेहमीच भारतात आणि परदेशात आकर्षणाची केंद्रे राहिली आहेत. पश्चिम बंगालमधील शांती निकेतन येथील विश्वभारती विद्यापीठात प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रज्ञावंतांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, देशाचा सांस्कृतिक, कला आणि परंपरा यांचा वारसा असो स्वातंत्र्य युद्ध असो बंगाल प्रत्येक बाबतीत देशातील इतर भागांपेक्षा 50 वर्षे पुढेच राहिला आहे. केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले की, विश्वभारतीला आता 100 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या या संस्थेतील विचारांचे नूतनीकरण करण्याचे प्रयत्न करायला हवेत. ते म्हणाले, की शांती निकेतन आणि विश्वभारती यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या चौकटीसाठी मोठे योगदान दिले आहे. अमित शाह म्हणाले, की गुरुदेव म्हणत की शिक्षणाचे महत्त्व सर्व प्रकारच्या अरुंद मर्यादा ओलांडून माणसाला भीतीमुक्त बनविणे, हे आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेल्या मंत्रांप्रमाणे येथील संकल्पनांनुसार आपल्या शिक्षण पध्दतीत बदल झाले तरच विश्वभारतीचा प्रवास यशस्वी झाला असे मानता येईल. गुरुदेव टागोर यांच्या संकल्पना आणि त्यांच्या व्यक्तीमत्वातील मोठेपणा यांचा परिणाम दोन भिन्न विचारसरणीच्या माणसांतून दिसून येतो, ते म्हणजे महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस, या दोघांनीही गुरुदेव टागोर यांच्या कडून प्रेरणा मिळविली होती.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, की विश्वभारतीने देशाला विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणारे अनेक व्यक्ती दिले आहेत. विश्व भारतीच्या 100 व्या वर्षी आपण ही परंपरा खंडीत होऊ देणार नाही आणि 50 वर्षांनंतर जेव्हा आपण तिची 150 वा वर्धापनदिन साजरा करू, त्यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे किमान 10 लोक तरी तयार करु, जे गुरुदेवांच्या संकल्पना देशातील लोकांच्या मनावर बिंबवीतील आणि त्यांना जीवनाचा आणि समाजाचा भाग बनवतील, असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शपथ घेऊ या. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, विश्वभारतीने नेहमीच जात, धर्म आणि वर्ग यावर विजय मिळवून मानवतेचा संदेश दिला आहे. विश्वभारतीने युरोपीय आणि भारतीय साहित्य आणि तत्वज्ञानाला एकत्र केले आहे आणि आपल्या वेदांतील विश्व बंधुत्वाचा मूलमंत्र सर्वेभवन्तुसुखिन: सर्वेसन्तुनिरामय: (सर्वांना सौख्य लाभो आणि कुणीही आजारी न पडो) हा मंत्र लक्षात ठेवला आहे. ते म्हणाले की, जोवर आपण ग्रामीण विकासाप्रतीची दृष्टी बदलणार नाही तोपर्यंत आपण आधुनिक मार्गांनी प्रगती साधू शकणार नाही. गुरुदेवांनी विश्वभारतीतून सुरू केल्याप्रमाणे सर्वांगीण विकास साध्य होणार नाही.
तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांनी शांती निकेतनमध्ये महान भारतीय विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहिली. तसेच त्यांनी विश्व भारती विद्यापीठातील प्रसिद्ध संगीत भवनालाही भेट दिली.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682303)
Visitor Counter : 221