ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
ईशान्य प्रदेश हा सर्वाधिक पसंतीचा पर्यटन आणि व्यापारी प्रदेश म्हणून कोविड पश्चात काळात उभारी घेईल : डॉ जितेंद्र सिंग
Posted On:
19 DEC 2020 8:48PM by PIB Mumbai
कोविड पश्चात काळात देशाचा ईशान्य भाग सर्वाधिक पसंतीचा पर्यटन आणि व्यापारी प्रदेश म्हणून उभारी घेईल असे प्रतिपादन केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज केले. ते आज दूरस्थ पद्धतीने आयोजित केलेल्या आठव्या ईशान्य महोत्सवात बोलत होते. प्रचंड नैसर्गीक संसाधने आणि मानवी कौशल्य यांच्या सहाय्याने ईशान्य विभाग एक आर्थिक शक्ती म्हणून उद्याला येत प्राधान्याने भारताच्या विकासात हातभार लावेल असे ते म्हणाले. हा प्रदेश अर्थव्यवस्थेचे ‘नवे इंजिन’ म्हणून काम करेलच शिवाय जगातील अनेक प्रदेश कोविड-ग्रस्त असताना कोविड-फ्री राहिल्यामुळे युरोपियन पर्यटनस्थळांना पर्याय म्हणूनही उद्याला येईल, असे त्यांनी नमूद केले.

आपल्याकडील बांबूसारख्या अनेक प्रचंड व अजूनही वापराविना असलेल्या नैसर्गीक संसाधनांचा वापर करून हा प्रदेश व्होकल फॉर लोकल मंत्राद्वारे आत्मनिर्भर अभियानाला प्रेरणा देऊ शकेल. केंद्र सरकारने नुकताच कच्च्या बांबूंच्या वस्तूंवर 25 टक्के आयात कर लावला आहे. यामुळे स्थानिक बांबू व्यवसायाला मदत होईल व बांधकामातील कच्चा माल म्हणून बांबूच्या वापराला चालना मिळेल. बांबूच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यासाठी 100 वर्षे जुन्या भारतीय वन कायद्यात सुधारणा करून छोट्या प्रमाणावर वाढवलेला बांबू त्यातून वगळला आहे.
फक्त या प्रदेशातच नव्हे तर देशभरातच रस्ते, रेल्वे, हवाईमार्ग यांचा विकासाच्या माध्यमातून मालाची वाहतूक तसेच प्रवास सोयीस्कर झाला आहे. सध्या या भागातील युवावर्ग आधीपेक्षा अधिक महत्वाकांक्षी झाला असून तो या प्रदेशाला वेगळ्या आर्थिक उंचीवर नेईल असे जितेंद्र सिंग म्हणाले.
सरकारच्या ईशान्य प्रदेशाकडे लक्ष देण्याच्या (Act East) धोरणाचा संदर्भ देत जितेंद्र प्रसाद म्हणाले की असियान सोबत व्यापार आणि व्यवसायातील संबध दृढ करण्यात ईशान्य प्रदेश महत्वाची भूमिका निभावेल. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, सिक्किम या राज्यांचे मुख्यमंत्री तसेच ईशान्येकडील राज्यांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
***
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682058)
Visitor Counter : 175