विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आयआयएसएफ 2020 या भव्य विज्ञान महोत्सवामध्ये आभासी पद्धतीने विज्ञानाचा अनुभव घ्या
Posted On:
17 DEC 2020 12:58PM by PIB Mumbai
सध्याच्या महामारीच्या काळात उत्साह आणि आनंदाच्या वातावरणाचा अनुभव दुरावलेला असताना पुन्हा हा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न विज्ञान आणि तंत्रज्ञान करत आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव( आयआयएसएफ) हे याच अनुभूतीचे एक सचेतन उदाहरण असून यामध्ये आभासी पद्धतीने विज्ञानाचा अनुभव घेता येणार आहे. “ आमच्या या महोत्सवात असे कार्यक्रम आहेत ज्यामध्ये विद्यार्थी आभासी सफरी करू शकतात, थ्रीडी प्रदर्शने आहेत, आभासी उपक्रम आहेत, चर्चासत्रे आहेत, व्याख्याने आणि इतर बरेच काही आहे.” या महोत्सवात एकूण 41 कार्यक्रम आहेत आणि यामध्ये प्रत्येकाचे स्वागत आहे, असे सीएसआयआर- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज(एनआयएसटीएडीएस), नवी दिल्लीच्या संचालक डॉ. रंजना अग्रवाल यांनी सांगितले. 22 ते 25 डिसेंबर 2020 या काळात आयआयएसएफचे आयोजन होणार आहे. सीएसआयआर- एनआयएसटीएडीएस ही संस्था आयआयएसएफ 2020 महोत्सवाचे आयोजन करणारी मुख्य संस्था आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग( डीएसटी), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद( सीएसआयआर), भूविज्ञान मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभाग( डीबीटी) यांनी संयुक्तपणे या विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या विज्ञान महोत्सवाशी संबंधित विविध कार्यक्रमांची माहिती आणि भागीदारांची नोंदणी करण्याची सुविधा आयआयएसएफच्या www.scienceindiafest.org. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
U.Ujgare/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681381)
Visitor Counter : 223