शिक्षण मंत्रालय

भारत आणि युनायटेड किंग्डम मधील शैक्षणिक सहयोग दृढमूल होणार


भारतीय राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची दूरदर्शी असे संबोधत युकेचे विदेशमंत्री  रॉब यांच्याकडून प्रशंसा, हे धोरण उभय देशांमधील सजीव पूल मजबूत करेल असे प्रतिपादन

शैक्षणिक पात्रतांना परस्परांची मान्यता दिली जाण्यासाठी कृतीदलाची स्थापना होणार

Posted On: 16 DEC 2020 7:12PM by PIB Mumbai

 

शिक्षणक्षेत्रातील परस्परसहयोग अधिक मजबूत करण्याचा ठराव भारत आणि युनायटेड किंग्डमने (युके ने) केला आहे.

भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंकआणि युकेचे विदेशमंत्री डॉमनिक रॉब यांच्यामध्ये आज बैठक झाली, त्यात शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील  सहभाग वाढवणे आणि पुढील वर्षात परस्पराच्या शैक्षणिक पात्रतेला  मान्यता देण्यावर सामायिक काम करणे या बाबींवर दोन्ही देशांचे एकमत झाले. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे तसेच उच्च शिक्षण सचिव अमित खरे व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

युकेचे विदेशमंत्री डॉमनिक रॉब यांनी भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची दूरदर्शी असे संबोधत प्रशंसा केली. यातील प्रस्तावित सुधारणा विद्यार्थ्यांसोबतच अर्थव्यवस्था आणि उभय देशांमधील संबध आणि सहभागासाठी संधीची दारे खुली करतील, असे ते म्हणाले. शिक्षण हा दोन्ही देशांदरम्यानचा सजीव पूल असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2018 या वर्षी युकेला दिलेल्या भेटीत केले होते, ते उधृत करत रॉब यांनी  हा पूल या धोरणामुळे अधिक मजबूत  होईल असा विश्वास व्यकत केला. भारतीय शिक्षणातून तावून सुलाखून येणाऱ्या शिक्षितांना युकेमध्ये सन्मान मिळतो तसेच भारतीय विद्यार्थ्यी देत असलेल्या योगदानाची आपल्या देशाला जाणीव आहे. विद्यार्थ्यांचे आगमन सुकर करण्यासाठी युकेने व्हिसा व कायमस्वरूप वास्तव्यासाठीच्या नियमांमध्ये अनेक बदल केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत आणि युकेमधील उच्चशिक्षण संस्थांमधील शैक्षणिक पात्रतेला उभय देशांमध्ये मान्यता देण्यासाठी संयुक्त कृतीदल स्थापन करण्यावर  भारत आणि युके यांची एकवाक्यता झाली. या कृतीदलाची रचना व  कार्यपद्धती यावर अधिकृत पातळीवर काहिही निर्णय झालेला नाही.

अश्या कृतीदलामुळे परस्परांच्या शैक्षणिक पात्रतेला मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला वेग येण्यास मदत होईल, असे शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी या प्रसंगी सांगितले. यामुळे उच्चशिक्षणाचे आंतरराष्ट्रीयिकरण  करण्याच्या भारताच्या निर्णयाला बळकटी येईल, असे ते म्हणाले. परस्परांच्या शैक्षणिक पात्रतेला उभय देशांमध्ये मान्यता  देण्याच्या दिशेने काम करण्याच्या ठराव हा  जागतिक पातळीवर देशाचे कार्यबळ वाढवणे व उच्चशिक्षणाचे आंतरराष्ट्रीयिकरण   करणे  या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतील संकल्पांशी सुसंगत असून यावर्षी जुलैमध्ये मांडल्या गेलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये   प्रस्तावित आहेत.

युके आणि भारत यांच्या शिक्षण क्षेत्रामधील संबधांवर बोलताना पोखरियाल म्हणाले, या दोन्ही देशांमधील संबध सकारात्मक आणि सहयोगाचे आहेत.  उभय देशांमधील आजचा ठराव हा परस्परविश्वास व शिक्षण, संशोधन तसेच नवनिर्माणाच्या क्षेत्रातील बंध वेगळ्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षण, संशोधन तसेच नवनिर्माण या क्षेत्रांमधील परस्परसंबध पुढे दृढ होऊन अधिक दृढमूल आणि मजबूत परस्परसंबधांकडे वाटचाल होईल असा विश्वास आणि आशा उभय देशांनी व्यक्त केली.

***

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681194) Visitor Counter : 170