वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
हस्तकला आणि जीआय (भौगोलिक संकेत) खेळणी गुणवत्ता नियंत्रण नियमांमधून वगळण्यात आली
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2020 3:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2020
देशातील मध्यम, छोट्या आणि सूक्ष्म खेळणी उत्पादन उद्योगांना चालना देण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालया अंतर्गत कार्यरत उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) खेळणी (गुणवत्ता नियंत्रण) द्वितीय सुधारणा आदेश, 2020 जारी केला आहे. विकास आयुक्तांकडे (हस्तकला) नोंदणीकृत कारागीरांकडून तयार केलेल्या आणि विक्री केलेल्या वस्तूंना भारतीय मानक ब्युरोच्या परवान्याअंतर्गत मानक चिन्ह वापरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
सुधारणा आदेश 2020 मध्ये, भौगोलिक संकेत म्हणून नोंदवलेल्या उत्पादनांना भारतीय खेळण्यांच्या मानदंडांचे पालन करण्यापासून आणि ब्यूरोकडून मानक चिन्ह परवान्याचा अनिवार्य वापर करण्यापासून सूट देण्यात आली आहे.
डीपीआयआयटीने यापूर्वी खेळण्यांचे प्रमाणीकरण आणि गुणवत्ता पालन यासाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी केले होते. 1 जानेवारी 2021 पासून हा आदेश लागू होईल. खेळण्यांचे दर्जेदार मानदंड कायम ठेवून खेळण्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे या आदेशाचे उद्दिष्ट आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1680210)
आगंतुक पटल : 219