पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती ईमॅन्युएल मॅक्रोन यांच्यातील दूरध्वनी संभाषण
Posted On:
07 DEC 2020 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती ईमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात 7 डिसेंबर 2020 रोजी दूरध्वनीद्वारे संभाषण झाले.
फ्रान्समध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आणि दहशतवाद, जहालमतवाद आणि कट्टरपंथीय विचारधारा यांच्याविरोधात फ्रान्सने सुरु केलेल्या लढ्याला भारताचा संपूर्ण पाठींबा आहे याचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठीची लस सहजतेने आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक बाबी, कोविड पश्चात काळात अर्थव्यवस्थेची पुन्हा उभारी, हिंद-पॅसिफिक प्रदेशातील सहकार्य, सागरी सुरक्षा, संरक्षणविषयक सहकार्य, डिजिटल अर्थव्यवस्था आणि सायबर सुरक्षा, बहुपक्षीय संबंधांचे सशक्तीकरण, हवामानातील बदल आणि जैवविविधता या मुद्यांसह परस्पर हिताच्या इतर द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर देखील चर्चा केली.
गेल्या काही काळात भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि सशक्त होत गेल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले आणि कोविड पश्चात काळात एकमेकांसोबत अधिकाधिक प्रमाणात सहकार्याने काम करणे सुरु ठेवण्याचा निर्धार एकमताने व्यक्त केला.
सामाजिक स्तरावर आरोग्यविषयक परिस्थिती सर्वसामान्य झाल्यावर राष्ट्रपती मॅक्रोन यांनी भारत भेटीवर यावे अशी इच्छा व्यक्त करत, आपण त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी त्यांना सांगितले.
U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679033)
Visitor Counter : 263
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam