सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांग सबलीकरण राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीची बैठक वाढत्या कोविड-19 प्रकोपामुळे पुढे ढकलली
Posted On:
02 DEC 2020 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 2 डिसेंबर 2020
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाला दिव्यांगाच्या सबलीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. दरवर्षी 3 डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या सबलीकरणात मोलाचे योगदान दिलेल्या सरकारी आस्थापना/ संस्था व खाजगी उपक्रम तसेच स्वतः दिव्यांगांचे योगदान आणि कौशल्य यांची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात येते. दिव्यांग सबलीकरण विभाग (दिव्यांगजन), सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय यांच्याकडून 25 जुलै 2020 ला राष्ट्रीय पुरस्कार-2020 साठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार विभागाला अर्ज आणि नामांकने प्राप्त झाली.
निवड प्रक्रिये अंतर्गत कागदपत्रांची सविस्तर तपासणी आणि अर्जदाराने प्रस्तुत केलेले तपशील यांची व्यवस्थित पडताळणी केली जाते. त्यांनंतर राष्ट्रीय निवड समितीपुढे ते सादर करण्यात येतात. त्यासाठी राष्ट्रीय निवड समितीची बैठक 01.12.2020 रोजी ठरविण्यात आली होती. परंतु, कोविड-19 परिस्थिती गंभीर रूप धारण करत असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. परिस्थितीत सुधार झाल्यावर राष्ट्रीय निवड समितीची बैठक होईल. त्याची योग्य प्रकारे आगाऊ सार्वजनिक सूचना देण्यात येईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677826)
Visitor Counter : 189