आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी टेलीमेडिसीन सेवेने पूर्ण केले 9 लाख लोकांना सल्ला देण्याचे कार्य
नोव्हेंबर 2019 मध्ये प्रारंभ केल्यापासून आयुषमान भारत -आरोग्य आणि निरामयता केंद्राच्या (AB-HWC) ई-संजिवनीद्वारे एका वर्षात पूर्ण केले 1,83,000 लोकांना टेलिफोनवरून सल्ला देण्याचे कार्य
ई-संजिवनी ओपीडी मधे 7,16,000 पेक्षा अधिक लोकांना सल्ला दिल्याची नोंद
Posted On:
02 DEC 2020 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 2 डिसेंबर 2020
आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय टेलीमेडिसीन उपक्रमाच्या ई-संजिवनीने आज उल्लेखनीय कामगिरी करत 9 लाख लोकांना सल्ला देण्याचे कार्य पूर्ण केले. ई-संजिवनी आणि ई-बाह्य रूग्ण विभाग याद्वारे सर्वात अधिक सल्ला मसलत करणारी दहा राज्ये तामिळनाडू (2,90,770), उत्तरप्रदेश (2,44,211),केरळ(60,401), मध्यप्रदेश(57,569), गुजरात(52,571), हिमाचल प्रदेश(48,187), आंध्रप्रदेश(37,681), उत्तराखंड(29,146), कर्नाटक(26,906) आणि महाराष्ट्र(10,903) ही आहेत.
टेलीमेडिसीन हे इंटरनेटचा वापर करून दुर्गम भागात रोगनिदान आणि उपचार करण्यासाठी वापरण्याचे नवीन तंत्र आहे. ई -संजिवनी या तंत्रामुळे डॉक्टर, रुग्ण आणि विशेषज्ञ यांचा भौगोलिक दृष्ट्या विखुरलेल्या जागेवरून दूरदृश्य प्रणालीद्वारे एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क होणे शक्य होते. या दूरस्थ सल्ल्याच्या अखेरीस ई-संजिवनी द्वारे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने प्रिस्क्रिप्शन(औषधाचे नाव), औषधोपचार करण्यासाठी तयार होते. कोविड-19 महामारीच्या काळात दुर्गम भागातील लोकांना बाह्य रूग्ण सेवा पुरविण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेल्या ई-संजिवनी उपक्रमात 28 राज्ये सहभागी झाली होती. ही राज्ये टेलीमेडिसीन सेवा दीर्घकाळ सुरू रहावी, यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने या उपक्रमाअंतर्गत दोन प्रकारच्या सेवांना आरंभ केला होता, त्या म्हणजे डॉक्टर ते डॉक्टर(ई-संजिवनी AB-HWC) आणि डॉक्टर आणि रुग्ण संभाषण प्रारुप ( ई-संजिवनी ओपीडी). आयुषमान भारत-एचडब्ल्यूसी या सेवेला आरंभ होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर 2019 मधे आंध्रप्रदेश हे पहिले राज्य होते जेथे ई-संजिवनी AB-HWC सेवा सुरू झाली आणि त्यानंतर विविध राज्यांत आत्तापर्यंत सुमारे 240 अशा प्रकारची केंद्रे आणि त्यायोगे 5,000 उपशाखा (संभाषण प्रारुपे)सुरू झाली. ई-संजिवनी AB-HWC सेवेने आतापर्यंत 1,83,000 लोकांना सल्ला देण्याचे कार्य पूर्ण केले आहे.
ई-संजिवनी ओपीडी हा टेलीमेडिसीन मधील दूरस्थ मार्गाने लोकांसाठी आरोग्य सल्ला मिळविण्याचा एक प्रकार आहे, ज्याचा आरंभ देशात पहिल्या टाळेबंदीच्या काळात, दिनांक 13 एप्रिल 2020 रोजी झाला. आतापर्यंत ई -संजिवनी ओपीडीवर सामान्य बाह्य रुग्णांसाठी आणि विशेष बाह्य रुग्णांसाठी असलेल्या 240 आँनलाईन बाह्य रुग्ण विभागात 7,16,000 लोकांनी सल्ला घेतल्याची नोंद झाली आहे. ई-संजिवनीचे दोन्ही प्रकार उपयोग, क्षमता आणि कार्यशीलता यात उत्तरोत्तर प्रगती करत आहे.
ई-संजिवनीचा मोहाली सी-डँकचा चमू राज्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्रालयासोबत जवळून काम करीत आहे. आरोग्य मंत्रालय देखील राज्यांशी नियमितपणे संपर्क साधून समाजातील वंचित भागाला ई-संजिवनी सेवेचा अधिक लाभ मिळवून देण्यासाठी रणनीती तयार करत आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात यासारखी काही राज्ये, इंटरनेटचा उपयोग न करता येणाऱ्या तसेच गरीब रुग्ण ज्यांना इंटरनेटशी जोडून घेणे शक्य होत नाहीत, अशा रुग्णांसाठी ई-संजिवनी सेवा विविध प्रारुपांद्वारे पुरविण्यासाठी प्रयोग करत आहेत.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677725)
Visitor Counter : 230