आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

WHO कडून मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल 2020: मलेरियाचा धोका कमी करण्यात भारताला सातत्याने लक्षणीय यश


मलेरियाचा प्रसार होणाऱ्या देशांपैकी एक असूनही भारत या एकमेव देशात 2018 पेक्षा 2019 मध्ये 17.6 टक्के कमी रुग्ण

Posted On: 02 DEC 2020 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  2 डिसेंबर 2020

गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणाऱ्या मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल (WMR) 2020 जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला आहे यानुसार भारताने मलेरियाचा धोका कमी करण्यात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे.

मलेरियाचा प्रसार असणाऱ्या देशांपैकी भारत हा एकमेव  असा देश आहे जिथे  2018 च्या तुलनेत 2019 मध्ये या आजाराच्या केसेस 17.6 टक्के ने कमी झाल्या आहेत. तसेच वार्षिक परजीवी घटनांमध्येसुद्धा( API) 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 27.6 टक्के घट आणि 2018 पेक्षा 2019 मध्ये 18.4 टक्के घट झालेली आहे.  हा आकडा 2012 पासून सातत्याने कमी राखण्यात भारताला यश आले आहे.

प्रादेशिक स्तरावरील संख्येनुसारही भारतामध्ये या आजाराची रुग्णसंख्या 20 दशलक्ष ते 6 दशलक्ष अशी लक्षणीय रित्या कमी झाली आहे.  मलेरिया रुग्ण संख्येचा टक्का 2000 ते 2019 पर्यंत 71.8 टक्के पर्यंत कमी झाला आहे तर आजाराने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही 73.9 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

मलेरियाची लागण होण्याच्या प्रमाणात  वर्ष 2000 (20,31,790 केसेस, 932 मृत्यू)   ते 2019  (3,38,494 केसेस, 77 मृत्यू) दरम्यान  83.34 टक्के घट झाली आहे तर मलेरियात  दगावण्याच्या प्रमाणात 92 टक्के घट झाली आहे. परिणामी मिलेनियम विकास उद्दिष्टांमधील सहावे उद्दिष्ट साध्य करण्यात यश आले आहे.( 2000 ते 2019 मध्ये रुग्णसंख्येत 50-75% घट)

Figure 1: मलेरिया साथरोगाच्या भारतातील प्रसाराचा (200-2019 दरम्यानचा) आलेख Pv; प्लाझमोडियम विवॅक्स pf; प्लाझमोडीयम फाल्सिफेरम

मलेरियाचे प्रमाण कमी झाले असल्याचे प्रत्येक वर्षाची मागील वर्षाशी केलेल्या तुलनेतही आढळून येते.  रुग्णसंख्या आणि आजाराने झालेले मृत्यू हे 2018 च्या (4,29,928 केसेस, 96 मृत्यू)  तुलनेत 2019 (3,38,494 केसेस, 77 मृत्यू) मध्ये अनुक्रमे 21.27% and 20% असे लक्षणीयरित्या कमी झाले आहेत. 2020मध्ये एकूण मलेरिया रुग्णसंख्या ऑक्टोबर पर्यंत  (1,57,284) 2019 मधील त्याच कालावधीशी तुलना करता (2,86,091) अजून  45.02 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

मलेरियाच्या उच्चाटनाचे प्रयत्न देशात 2015 पासून सुरू झाले आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 2016मध्ये मलेरिया उच्चाटनासाठी  राष्ट्रीय नियमावली (NFME)  प्रत्यक्षात आणल्यानंतर त्यांना वेग आला.  आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने जुलै- 2017 मध्ये मलेरिया उच्चाटनासाठी राष्ट्रीय  धोरणात्मक योजना (2017-22) प्रसिद्ध केली त्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठीच्या धोरणाची मांडणी केली आहे.

Figure 2:  भारतातील मलेरिया साथरोग परिस्थिती (2015 – 2019)

पहिल्या दोन वर्षामध्ये आजाराच्या केसेसमध्ये 27.7% घट झाली आणि मृत्यूतही 49.5% घट झाली; 2015 मध्ये 11,69,261 रूग्ण आणि 385 मृत्यू ते 2017 मधील 8,44,558 केसेस आणि194 मृत्यू.

ओदिशा, छत्तीसगढ़, झारखंड, मेघालय आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये 45.47 टक्के मलेरिया आजाराचे रुग्ण आहेत (भारताच्या 3,38,494 या एकूण रुग्णसंख्येपैकी 1,53,909 रुग्णसंख्या) तर 2019 या वर्षात फाल्सिफेरम मलेरियाचे 70.54 टक्के रुग्ण (भारताच्या 1,56,940 या एकूण रुग्णसंख्येपैकी 1,10,708 रुग्णसंख्या)

सुक्ष्मदर्शकांचा पुरवठा, जलद निदान, टिकावू किटक प्रतिरोधक जाळ्या असे भारत सरकारतर्फे प्रयत्न करण्यात आले. इशान्य भारतातील सात राज्ये, छत्तीसगढ़ झारखंड, मध्यप्रदेश आणि ओदिशा या मलेरिया साथरोगाचा भर असणाऱ्या राज्यांमध्ये 2018-19 पर्यंत 5 कोटी किटक प्रतिरोधक जाळ्या तर आताच्या आर्थिक वर्षात अजून 2.25 कोटी किटक प्रतिरोधक जाळ्यांचा पुरवठा केल्यामुळे मलेरियाचा प्रसार कमी होण्यास बऱ्याच अंशी मदत झाली.  जनतेने मोठया प्रमाणावर या जाळ्यांचा वापर स्वीकारला आणि देशातील मलेरियाच्या संसर्गाला आळा बसण्यास मदत झाली.

HBHI(High Burden High Impact)  प्रदेशातील (2016-2019) API चे खालावणारे प्रमाण

 

WHO ने भारतासह 11 देशांमध्ये उच्च धोका उच्च परिणाम म्हणजेच HBHI (High Burden High Impact) प्रदेश निर्धारित केले होते. या उच्च धोका उच्च परिणाम म्हणजेच HBHI (High Burden High Impact) कार्यक्रमाची सुरूवात पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ़ आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये  जुलै 2019 पासून झाली.  मलेरिया उच्चाटनासाठी WHO ने RBM सह भागीदारीत या HBHI ची प्रगती मोजण्यासाठी एक मुख्य धोरण 2018 मध्ये आखले होते. याचे उत्तम परिणाम मिळायला लागून गेल्या दोन वर्षात रुग्णसंख्येत 18% तर मृत्यूसंख्येत 20% घट दिसून आली

मलेरियाचे प्रमाण 31 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात  लक्षणीय आहे. ( आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश मणीपूर, मिझोराम, नागालँड, ओदिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, चंदीगढ़, दमण आणि दीव, दादरा नगरहवेली व लक्षद्वीप) आणि या मलेरिया साथरोगाचे वाढते प्रमाण असणाऱ्या राज्यांमध्ये मलेरियाचे प्रमाण कमी होताना आढळते आहे. वर्ष 2018 च्या तुलनेत 2019मध्ये आजाराचे घटलेले प्रमाण पुढीलप्रमाणे - ओदिशा – 40.35%,मेघालय- 59.10%, झारखंड – 34.96%, मध्य प्रदेश  –36.50% आणि छत्तीसगढ़ –23.20%.

गेल्या दोन दशकांतील आकडे आणि कल यानुसार मलेरियाचे लक्षणीरित्या कमी झालेले प्रमाण दाखवतात.  2030 मध्ये मलेरियाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट हे त्या दिशेने केंद्र सरकार करत असलेल्या अविरत प्रयत्नांमुळे साध्य होताना दिसत आहे.

GIS maps - मलेरिया साथरोगाचा जिल्हानिहाय घटता प्रभाव

 

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1677684) Visitor Counter : 810