पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते देशातील एमएनजीएलच्या 100 व्या सीएनजी स्थानकाचे उद्‌घाटन आणि देशार्पण


आमचा पथदर्शी ऊर्जा संक्रमणाचा मार्ग आत्मनिर्भरतेकडे नेईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करेल: धर्मेंद्र प्रधान

Posted On: 01 DEC 2020 12:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  1 डिसेंबर 2020

केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी आज देशातील  5 एमएनजीएलच्या स्थानकांचे उद्‌घाटन आणि त्यांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे केले,ज्यामुळे कंपनीच्या सीएनजी स्थानकांची संख्या आता 100 झाली आहे.त्याचबरोबर त्यांनी पाथर्डी, नाशिक या महाराष्ट्रातील एलएनजी/सीएनजीच्या(LNG/CNG) नागरी कामकाजाचे, तसेच नाशिक येथील बसेसना सीएनजीचा पुरवठा करण्याच्या कामाचे आणि पुण्यातील सीएनजी मोबाईल रीफ्युएलींग युनिटच्या (MRU) वितरणाचे उद्‌घाटन केले.

या प्रसंगी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की 2030 पर्यंत शाश्वत ऊर्जेच्या वापरासाठी प्रार्थमिक ऊर्जेत 15% नैसर्गिक वायूचा हिस्सा मिळवण्यासाठी भारत कटीबद्ध आहे.यामुळे पर्यावरणीय प्रदूषण कमी होईल, COPE-21 च्या करारातील हवामान बदल वचनबद्धतेची पूर्तता होईल.ते पुढे म्हणाले ,की नैसर्गिक वायूचा अधिक वापर केल्याने जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होईल, आयात खर्च कमी होईल त्याचप्रमाणे आयातीवर अवलंबून रहाणे देखील कमी होईल.आमचा पथदर्शी ऊर्जा संक्रमणाचा मार्ग  आत्मनिर्भरतेकडे  नेईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करेल,असेही धर्मेंद्र प्रधान यांनी पुढे सांगितले.

मंत्री महोदय म्हणाले, की आज झालेल्या उद्घाटनानंतर एमएनजीएलचे सीएनजी स्थानकांचे जाळे 100 इतके झाले आहे.आज त्यात आणखी 5 ची भर पडल्यामुळे स्थानकांची संख्या जवळपास 2500 इतकी होईल. परंतु येत्या 7-8 वर्षांत ही संख्या 10,000 वर नेण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील रहायला हवे,असेही ते पुढे म्हणाले.ते म्हणाले, की महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने(SRTC) आपल्या बसेसची पुनर्रचना करून त्यात सीएनजी बसविण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मला मिळाली आहे, तसेच केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळ असे रूपांतरण करण्याची चाचणी घेऊन नक्की करत आहे.एमएनजीएल देशातील पहिले मोबाईल रीफ्युएलींग युनिट बसविण्याच्या कार्यात अग्रेसर ठरले आहे.

प्रधान म्हणाले, की सीजीडी क्षेत्र नैसर्गिक वायूच्या वापरासाठी एक  प्रमुख उद्योग म्हणून उदयास येत आहे. जसजसा वायू अधिकाधिक कार्यांसाठी उपलब्ध होईल तसतसा  त्याची घरगुती कामे, वाहतूक, व्यवसाय आणि उद्योग यांच्यातील सीजीडी नेटवर्कचा वापर अधिकाधिक वाढत जाईल.

प्रधान म्हणाले, की भारतातील सुवर्ण चतुर्भुज आणि देशभरातील महत्वाच्या महामार्गांवरील, पहिल्या 50 एलएनजी स्थानकांची पायाभरणी सध्याच्या एलएनजी आधारीत सीएनजी  स्थानकांच्या बरोबर  झाली. भारत सरकार पुढील  तीन वर्षात 1000 एलएनजी स्थानके उभारण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक  करणार आहे,असे प्रधान यावेळी म्हणाले.

मंत्री महोदय म्हणाले, की सीएनजी/एल एनजीएलच्या पायाभूत  सुविधांवर  भर दिल्याने मूल संसाधन उत्पादन (OEM)क्षेत्र, शहर वायू वितरणासाठी (CGD)उपकरणे तयार करणे, वाहतूक क्षेत्र यांत मोठी गुंतवणूक होऊन ,रोजगार निर्मिती होईल आणि ती भारताला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारी  मोठी झेप ठरेल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव श्री. तरुण कपूर यावेळी बोलताना म्हणाले, सरकार सीएनजी/एलएनजी स्थानके उभारण्यासाठी पूर्ण सहाय्य देत आहे, तसेच कंपन्यांनी आपले प्रकल्प अधिकाधिक वाढवावेत,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. येत्या काही काळात 2-3 सीबीजी प्रकल्प वायु नेटवर्कशी जोडण्याचे  निश्चित केले जाईल,याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

M.Chopade/S.Patgoankar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1677663) Visitor Counter : 163