गृह मंत्रालय

कमी दाबाच्या पट्टयाबाबत कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली  एनसीएमसीची बैठक

Posted On: 01 DEC 2020 5:42PM by PIB Mumbai

 

तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर  कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली. तमिळनाडू, केरळचे  मुख्य सचिव, लक्षद्वीपचे सल्लागार  आणि वेगवेगळ्या मंत्रालयांचे सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वेगवेगळ्या वेगाने वाहणाऱ्या वार्‍याचा परिणाम तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर होणार असून 2-4  डिसेंबरदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या  महासंचालकांनी दिली  आहे. यामुळे आतापर्यंत  पिकांचे नुकसान व काही आवश्यक सेवांवर परिणाम होण्याची  शक्यता आहे. 4 डिसेंबरपर्यंत मासेमारी  पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे असेही ते म्हणाले.

तामिळनाडू, केरळचे मुख्य सचिव व  लक्षद्वीपचे सल्लागार  यांनी एनसीएमसीला संबंधित जिल्ह्यामध्ये   जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समित्यांनी केलेली  तयारी आणि व्यवस्थेबद्दल तसेच मच्छीमारांना देण्यात आलेला इशारा आणि  बचाव पथकांच्या तैनातीविषयी  माहिती दिली.

या भागात आवश्यक पथके तैनात  करण्यात आली असून उर्वरित पथके  तामिळनाडूमध्ये तयार ठेवण्यात आली आहेत , अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या महासंचालकानी दिली.

नागरी विमान वाहतूकदूरसंचार, उर्जा, गृह, एनडीएमए मंत्रालयांच्या सचिवांनी आणि संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींनीही एनसीएमसीला त्यांच्या सज्जतेबद्दल  माहिती दिली.

कॅबिनेट सचिवांनी राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्रालयाना  कमीतकमी  नुकसान  सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कारवाई करायला आणि आवश्यक सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती तयारी करायला सांगितले आहे.

 

M.Chopade/M.Kane /P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677432) Visitor Counter : 204