राष्ट्रपती कार्यालय
श्री.गुरुनानक जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
29 NOV 2020 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 29 नोव्हेंबर 2020
श्री.गुरुनानक जयंतीच्यापूर्वसंध्येला राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाले, “श्री.गुरुनानक जयंतीनिमित्त देशातील जनतेला आणि परदेशातील सर्व नागरिकांना विशेषतः शीख समुदायातील बंधू आणि भगिनींना अभिवादन करत आहे आणि शुभेच्छा देत आहे.
गुरुनानक देव यांचे जीवन आणि शिकवणूक सर्व मानवजातीचे प्रेरणास्थान आहे. त्यांनी लोकांना ऐक्य, सुसंवाद,बंधुत्व, एकोपा आणि सेवा यांचा मार्ग दाखविला आणि परीश्रम, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान यावर आधारीत जीवनशैली समजून घेण्याचे आर्थिक तत्त्वज्ञान सांगितले.
गुरुनानक देव यांनी ‘एक ओमकार’ हा मूलमंत्र आपल्या अनुयायांना दिला आणि जाती,धर्म,आणि लिंग यांच्या आधारे भेदभाव न करता सर्वांशी समान वर्तणूक करण्याचा आग्रह धरला. त्यांच्या ‘नाम जपो,कीरत करो आणि वंद छाको,’ या संदेशात त्यांच्या सर्व शिकवणीचे सार आले आहे.
गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिकवण आचरणात आणून त्यानुसार वागण्याचा आपण सर्व जण प्रयत्न करु या”
राष्ट्रपतींच्या संदेशासाठी येथे क्लिक करा
Jaydevi P.S./S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677023)
Visitor Counter : 179