श्रम आणि रोजगार मंत्रालय

कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाने निवृत्तीवेतन धारकांना आपले जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविली ; 35 लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ होणार

Posted On: 28 NOV 2020 6:08PM by PIB Mumbai

 

सध्या सुरू असलेली कोविड-19 महामारी आणि त्याचा वयोवृद्धांना असलेला धोका लक्षात घेऊन कर्मचारी भविष्यनिधी कार्यालयाने ,जे निवृत्तीधारक आपले निवृत्तीवेतन ईपीएस 1995 या द्वारे मिळवितात  आणि ज्यांचे जीवन प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी 2021 च्या आधी कोणत्याही महिन्यात देण्यालायक असेल,अशा निवृत्तीधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र (JPP) सादर करण्यासाठी दिलेली मुदत दिनांक 28 फेब्रुवारी  2021 पर्यंत वाढविली आहे.सध्या निवृत्तीवेतन धारक हे प्रमाणपत्र  वर्षभरात दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत कधीही सादर करू शकत होते, जे निर्गमित केल्यापासून एक वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध असते.

असे सर्व निवृत्तीवेतनधारक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील. हे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3.65 लाख  सामान्य सेवा केंद्रे (CSCs), निवृत्तीवेतन वितरीत करणाऱ्या बँकेच्या शाखा, टपाल विभागाअंतर्गत येणारी 1.36 लाख टपाल कार्यालये,1.90 लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या मार्फत निवृत्तीवेतनधारकांना पाठविता येते.

निवृत्तीवेतन धारक आपल्या जवळचे सामान्य सेवा केंद्र  शोधण्यासाठी ही लिंक -(https://locator.csccloud.in/ )-वापरू शकतात आणि आपले जीवन प्रमाणपत्र आपल्या घरातून सुलभपणे किंवा इतरत्र कोठूनही, जवळच्या टपाल कार्यालयातून आँनलाईन पध्दतीने पाठविण्यासाठी-(http://ccc.cept.gov.in/covid/request.aspx )- या लींक वर जाऊ शकतात.

ज्या निवृत्तीवेतन धारकांनी आपले जीवन प्रमाणपत्र 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर केले नाही, या वाढीव कालावधीमध्ये अशा 35 लाख कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन थांबविले जाणार नाही.

***

S.Tupe/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1676775) Visitor Counter : 108