विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जीआयटीए, द्विपक्षीय शैक्षणिक-उद्योग आणि शासकीय सहकार्याला प्रोत्साहन देऊन नवोन्मेष आणि औद्योगिक संशोधन आणि विकासासाठी सहायक : केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन

Posted On: 28 NOV 2020 5:01PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन, यांनी जीआयटीए च्या 9 व्या स्थापना दिनानिमित्त व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. जागतिक नवोन्मेष आणि तंत्रज्ञान युति (जीआयटीए) ने द्विपक्षीय शैक्षणिक उद्योग आणि सरकारी सहकार्यांना प्रोत्साहन देऊन नवोन्मेष आणि औद्योगिक संशोधन आणि विकास यांचे सहायक म्हणून काम केले, हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

जीआयटीए च्या माध्यमातून डीएसटी इस्राईल, कोरिया, कॅनडा, फिनलँड, इटली, स्पेन आणि ब्रिटन यासारख्या जगातील काही नाविन्यपूर्ण देशांच्या सहकार्याने द्विपक्षीय औद्योगिक संशोधन व विकास प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीत यशस्वी झाला आहे”, असे  डिजिटल पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले.

जागतिक नवोन्मेष आणि तंत्रज्ञान युति (जीआयटीए) (विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि भारतीय उद्योग परिसंघ यांच्या तंत्रज्ञान विकास मंडळाच्या (टीडीबी) दरम्यान पीपीपी) ने नुकताच सीआयआय हाईव्ह व्यासपीठावर आत्मनिर्भर भारतसंकल्पनेसह  आपला 9 वा स्थापना दिन साजरा केला.

या आव्हानात्मक काळाचा उपयोग भारताने स्वावलंबी होण्याची संधी म्हणून करावा या पंतप्रधानांच्या आवाहनाच्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारतासाठी देशातील वैज्ञानिक वातावरणाला प्रोत्साहन देण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आघाडीवर आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव आणि प्रमुख अतिथी प्रा. आशुतोष शर्मा यांनी अनेक वर्षांत घडलेल्या मोठ्या बदलांबाबत माहिती दिली. आपण आत्मनिर्भर भारतला वगळू शकत नाही; जागतिक संशोधन आणि विकास पुरवठा शृंखलेचा एक भाग होण्यासाठी आणि जागतिक स्तरावर वितरण करण्यासाठी याला अधिक समाविष्ट करायला हवे असे शर्मा म्हणाले. तंत्रज्ञान विकास मंडळाचे (टीडीबी) सचिव डॉ. नीरज शर्मा म्हणाले की, आगामी काळात टीडीबी आणि जीआयटीए मधील सहकार्य क्षेत्र वाढविण्याची त्यांची इच्छा आहे.

या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भागीदार देशांच्या सहकार्याने यावर्षी पूर्ण झालेल्या तीन यशस्वी प्रकल्पांचा सत्कार करण्यात आला.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांचे अतिरिक्त विकास आयुक्त पीयूष श्रीवास्तव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे आंतरराष्ट्रीय सहकार प्रमुख एस.के. वार्ष्णेय, जीआयटीए मंडळाचे पहिले सदस्य व अध्यक्ष दीप कपूरिया, आणि हाय-टेक ग्रुप ऑफ कंपन्यांनीही या कार्यक्रमाल हजेरी लावली.

 

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003L1QD.jpg

 

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0042A3F.jpg

S.Tupe/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676751) Visitor Counter : 207