रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
व्हिंटेज वाहने नोंदणी करण्याच्या प्रस्तावित नियमांकरिता जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत
Posted On:
27 NOV 2020 1:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी जीएसआर 734 (ई) प्रकाशित केले असून व्हिंटेज मोटार वाहनांसंदर्भात सीएमव्हीआर 1989 च्या दुरुस्ती संदर्भात हरकती व सूचना मागविल्या आहेत.
या अधिसूचनेद्वारे व्हिंटेज मोटार वाहनांची नोंदणी प्रक्रियेला आकार देण्याचा मंत्रालयाचा मानस आहे. हेरिटेज वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणतेही नियम नाहीत. हे नियम केंद्रीय मोटर वाहन नियम,1989 मध्ये पोट-नियम 81 ए, 81 बी, 81 सी, D81डी, 81ई, 81एफ, 81जी म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
नियमांमध्ये व्हिंटेज मोटार वाहनांची व्याख्या केली गेली आहे. अशी सर्व वाहने जी दुचाकी आणि चारचाकी वाहने (अव्यावसायिक / वैयक्तिक वापर) आहेत आणि त्यांच्या पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून (आयात केलेल्या वाहनांसह) 50 वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत त्यांना व्हिंटेज मोटर वाहने म्हणून संबोधले जावे.
कार्यपद्धतीः नोंदणीसाठी सर्व अर्ज “परिवहन” पोर्टलवर करावेत असा प्रस्ताव आहे. पुढे प्रस्तावित आहे कीः
- सर्व राज्य नोंदणी प्राधिकरण एक नोडल अधिकारी नियुक्त करतील जे व्हिंटेज मोटर वाहनांच्या नोंदणीसाठी सर्व अर्जांवर काम करेल.
- तसेच, राज्ये एक समिती गठित करेल जी वाहनाची तपासणी करेल आणि विंटेज मोटर वाहन अंतर्गत नोंदणीसाठी वाहन योग्य आहे की नाही ते जाहीर करेल.
- मंजूर झाल्यास संबंधित व्हिंटेज वाहनाला 10 अंकी अल्फा संख्यात्मक क्रमांक देण्यात येईल. ही नोंदणी 10 वर्षांसाठी वैध असेल. नोंदणी चिन्हाच्या रूपात “XX VA YY ****” अक्षरे असतील, जिथे VA म्हणजे व्हिंटेज आहे, XX हा राज्याचा कोड आहे, YY दोन अक्षरे असतील आणि “****” ही 0001 ते 9999 पर्यंतची एक संख्या असेल जी राज्य नोंदणी प्राधिकरणाद्वारे दिली जाईल.
- नवीन नोंदणीसाठीचे शुल्क- 20000 रुपये आणि त्यानंतर पुन्हा नोंदणीसाठी - 5,000 रुपये आहे.
- व्हिंटेज मोटार वाहनाचा प्रतिबंधित वापरः व्हिंटेज मोटर वाहनाला केवळ प्रदर्शन, तांत्रिक संशोधन किंवा व्हिंटेज कार रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी, भारतीय रस्त्यावर धावण्याची परवानगी आहे.
भारतातील जुन्या वाहनांचा वारसा जपणे आणि प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे.
नागरिकांना या प्रस्तावित नियमांवरील हरकती व सूचना, काही असल्यास, अधिसूचना जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संचालक (एमव्हीएल) यांना director-morth[at]gov[dot]in या ईमेलवर किंवा रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली -1000001 या पत्त्यावर पाठवू शकतात.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676402)
अभ्यागत कक्ष : 215