मंत्रिमंडळ

असीम इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड (AIFL) आणि एन आय आय एफ इन्फ्रास्ट्रक्टचर फायनान्स लिमिटेड  यांचा समावेश असलेल्या  एन आय आय एफ इन्फ्रास्ट्रक्टचर डेट फायनान्सिंग प्लॅटफॉर्म मध्ये  6 हजार कोटी रुपयांच्या भांडवल भरणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळ गटाची  मंजूरी

Posted On: 25 NOV 2020 7:49PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळ गटाने  राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF) प्रायोजित तसेच असीम इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड (AIFL) आणि NIIF Infrastructure यांचा समावेश असलेल्या   एन आय आय एफ इन्फ्रास्ट्रक्टचर डेट फायनान्सिंग प्लॅटफॉर्म मध्ये 6000कोटी रुपयांच्या भांडवल भरणा करण्याच्या प्रस्तावाला खालील अटींवर मंजूरी दिली आहे.

2020-21 या चालू वर्षात फक्त 2000 कोटी रुपये  दिले जातील. परंतू, कोविड-19 मुळे दुष्कर होत जाणारी सार्वत्रिक परिस्थिती आणि बिकट आर्थिक स्थिती आणि कमी वित्तिय अवधी यामुळे प्रस्तावित निधी हा कर्ज उभारणीची तयारी आणि मागणी असेल तरच दिला जाईल.

अंतर्गत आणि जागतिक निवृत्तीवेतन निधी आणि सार्वभौम संपत्ती निधीच्या तत्पर वापरासाठी  NIIF योग्य ती पावले उचलेल.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी 12 नोव्हेंबर 2020 रोजी आत्मनिर्भर भारत 3.00 अंतर्गत सरकारतर्फे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केलेल्या  बारा उपाययोजनांपैकी  ही एक योजना आहे.

NIIF Strategic Opportunities Fund (SOF fund)   च्या माध्यमातून NBFC इन्फ्रा डेट फंड आणि NBFC इन्फ्रा फायनान्स कंपनी यांचा   एक डेट प्लॅटफॉर्म तयार केला आहे . राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी ने  स्ट्रॅटेजिक अपॉर्च्युनिटीज फंड (‘NIIF SOF’)  च्या माध्यमातून या दोन्ही कंपन्यांमध्ये मोठा हिस्सा मिळवला असून याद्वारे आधीच 1,899 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. NIIF ज्या   NIIF Strategic Opportunities Fund (SOF fund)   च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहे तो या दोन्ही कंपन्यांना आधार देण्यासोबतच इतर योग्य पर्यायात गुंतवणूक करेल. 

हा सद्यस्थितीतील प्रस्ताव पायाभूत कर्ज वित्तीय पुरवठ्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या गुंतवणूकीला असलेला वाव आणि त्याचा या दोन्हीवर होणारा परिणाम याच्या शक्यता लक्षात घेईल. आंतरराष्ट्रीय भांडवल उभारणीसाठी व्यासपीठाच्या प्रयत्नांनाही ते सहाय्य करेल. सरकारकडून नुकताच झालेला भांडवल पुरवठा आणि NIIF SOF कडून झालेली भांडवल उभारणी तसेच खाजगी क्षेत्रातून होणारा संभाव्य भांडवली सहभाग यामुळे पुरेश्या संसाधनांद्वारे 2025 पर्यत हा कर्ज आधार 2025 पर्यंत 1,10,000   कोटी रुपयांपर्यंत पोचेल.

 

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे

1.  एक वर्षाच्या आतपूर्ण होतील अशा   निर्माणाधीन / ग्रीन फिल्ड/ ब्राउन फिल्ड क्षेत्रातील मत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचे  असीम इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडचे धोरण आहे.   NIIF ची पायाभूत सुविधा कर्ज निधी उभारणीसाठी स्वतःची मुल्याकंन प्रणाली असेल, त्यामुळे त्वरीत निधी उभारणी होउ शकेल.

2.   एन आय आय एफ इन्फ्रास्ट्रक्टचर फायनान्स लिमिटेड  (NBFC-IDF) हे मॅच्युअर ऑपरेटींग मालमत्तेसाठी उपयुक्त साधन ठरेल. पायाभूत सुविधा निधी गुंतवणूकदारांना बँकांच्या जास्त दराच्या  निधीऐवजी स्वस्त IDF निधीचा वापर करता येईल. पुढील 5 वर्षात (NIP Plan Period), NIIF इन्फ्रास्ट्रक्चर कर्ज पुरवठा हा सुमारे 1,00,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा उभारणीला सहाय्यक ठरेल.

3.    यासाठी अधिक कालावधीच्या बाह्य भांडवल उभारणीचे तसेच अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून पुढील पाच वर्षात कर्ज उभारणीची आवश्यकता आहे. परिणामी भारत सरकारकडून 6000 कोटी रुपयांचा प्रस्तावित भांडवल पुरवठ्याच्या 14 ते 18 पट भांडवल उभारणी होईल.

4.    NIIF अर्थात राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी हे  NIIF Infrastructure Debt Financing Platformमध्ये अंतर्ग त तसेच आंतरराष्ट्रीय निवृत्तीवेतन, विमा आणि सार्वभौम निधी साठ्यांतून सरकारच्या भांडवल गुंतवणूकीला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

 

खर्च :

NIIF Debt Platform मध्ये  2020-21 and 2021-22 या दोन आर्थिक वर्षात 6000 कोटी रुपये भांडवल म्हणून गुंतवले जातील.

 

परिणामः

पुढील पाच वर्षात पायाभूत क्षेत्रात NIIF"" राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी""  पायाभूत सुविधा कर्ज पुरवठा प्लॅटफॉर्म ने कर्ज स्वरूपात 1 लाख कोटीचे सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्यामुळे राष्ट्रीय पायाभूत सुविधा माध्यमातून पायाभूत सुविधा क्षेत्रात आधिकाधिक गुंतवणूक येईल.

यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्पांचे बँकेचा सहाय्य पुरवठ्यावरील अवलंबन कमी होईल. आणि नवीन ग्रीन फिल्ड प्रकल्पांना चालना मिळेल. IDF ला बळकटी येण्यासोबतच  पायाभूत सुविधा क्षेत्रातील टेक आउट आर्थिक शक्यता ही पायाभूत मिळकतीची रोकडसुलभता वाढवेल आणि धोका कमी करेल.

भारतात पायाभूत सुविधा प्रकल्प हे SPVsअर्थात स्पेशल पर्पज वेहिकल  मधून उभारले जातात. SPVs ना बांधकाम पूर्णत्वानंतरही आपली गुंतवणूक प्रतवारी करणे आव्हानात्मक वाटते. डेट प्लॅटफॉर्म विश्वासपात्र मध्यस्त या नात्याने बॉण्ड मार्केटमधूनही कर्ज उभारणी करू शकेल. रेटींग एजन्सी Care कडून असीम इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड ला AA रेटींग तर  NIF-IFL Care Ratings and ICRA  कडून AAA रेटींग मिळाले आहे.  बॉंण्डमध्ये गुंतवणूक करणारे  बँकांपेक्षा कमी मार्जिन शोधणारे असतात आणि स्वतःच्या जोखिम व्यवस्थापन नियमानुसार AAA / AA रेटींगच्या आस्थापनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

पुरेसे भांडवल, पुरेसा  निधी आणि योग्य व्यवस्थापन असलेला NIIF अर्थात राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी  डेट प्लॅटफॉर्म हा AAA/AA मानांकन असलेला मधस्थ या नात्याने भारतीय बॉण्ड मार्केटचा विकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील  निधी पुरवठ्यात महत्वाची भूमिका बजावेल.

 

पार्श्वभूमीः

National Infrastructure Platform (NIP)अर्थात राष्ट्रीय पायाभूत सुविधा व्यासपीठनुसार पुढील पाच वर्षात पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक ही  विविध उप-क्षेत्रातील गुंतवणूक जमेस धरून 111 लाख कोटींपर्यंत करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे कर्ज भांडवलाची उभारणी होईल. सध्याच्या परिस्थितीत 60 ते 70 लाख कोटींची  कर्ज उभारणीची  आवश्य़कता आहे. राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF) द्वारे विकास पावलेल्या पायाभूत सुविधा लक्ष्यित वित्त संस्थां प्रकल्पाच्या एकूण कालावधीवर लक्ष केंद्रीत करुन भव्य भांडवली पाया  तयार करतील

***

Jaydevi PS/V.Sahajrao /P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1675786) Visitor Counter : 318