आयुष मंत्रालय
भारतीय वैद्यक केंद्रीय परीषदेचे (पदव्युत्तर आयुर्वेदीक अभ्यासक्रम) अधिनियम दुरुस्ती 2020 संदर्भातील स्पष्टीकरण
Posted On:
22 NOV 2020 9:06PM by PIB Mumbai
भारतातील आयुर्वेद, सिध्द,सोवारिग्पा(पारंपरीक तिबेटी वैद्यक ज्ञान) आणि युनानी वैद्यक पध्दतींचे नियमन करणाऱ्या ,भारतीय वैद्यक केंद्रीय परीषद( सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, CCIM) या वैधानिक संस्थेने दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षण संदर्भातील काही तरतुदींचे नियमन सुरळीत करण्यासाठी,त्यातील काही बाबींबद्दल सुस्पष्टता येण्यासाठी आणि व्याख्या समजून घेण्यासाठी एक अधिसूचना जाहीर केली होती.
या अधिसूचनेसंदर्भात काही चुकीच्या स्वरुपाच्या माहितीची नोंद आणि त्याचे चुकीच्या पध्दतीने केलेले विश्लेषण यांच्या आवृत्त्या काही माध्यमांतून दृष्टीस पडल्या असून त्यामुळे या सूचनेच्या स्वरुपाबद्दल आणि उद्दिष्टाबाबतची चुकीची माहिती प्रसारीत होत आहे, असे आयुष मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. चुकीच्या माहितीच्या स्पष्टीकरणामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीला दूर करण्यासाठी आयुष मंत्रालय आता या प्रकरणामुळे उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खालील प्रमाणे स्पष्टीकरण देत आहे.
1. भारतीय वैद्यक केंद्रीय परीषद (पदव्युत्तर आयुर्वेदीक अभ्यासक्रम) अधिनियम सुधारणा कशाच्या संदर्भात करणार आहे?
ही अधिसूचना पदव्युत्तर आयुर्वेद शिक्षणाच्या शल्य आणि शालक्य शाखोशी संबंधीत आहे. या अधिसूचनेद्वारे(आधीच्या या विषयावरील सूचनेपेक्षा अधिक सुस्पष्ट पध्दतीने) विशिष्ट उल्लेख करत स्पष्ट करण्यात आले आहे, की या धारेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एकूण 58 शल्यक्रियांमधे व्यावहारिक पध्दतीने प्रशिक्षित करण्यात यावे, जेणेकरून त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया स्वतंत्रपणे करता येणे शक्य होईल. ही अधिसूचना अशाच प्रकारच्या विशिष्ट शस्त्रक्रियांसाठी आहे, आणि शल्य आणि शालक्य पदव्युत्तर विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी देत नाही.
2. ही अधिसूचना आयुर्वेदिक चिकित्सकांच्या शस्त्रक्रिया करण्याच्या पध्दतीत धोरणात्मक बदल सूचित करते का?
नाही. या अधिसूचनेत 2016 सालापूर्वी केलेल्या संबंधित नियमांच्या तरतुदींबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आरंभापासूनच आयुर्वेदिक महाविद्यालयात अशा शस्त्रक्रियांसाठी शल्य आणि शालक्य असे स्वतंत्र विभाग असतात. 2016च्या अधिनियमानुसार असे नमूद करण्यात आले होते, की विद्यार्थांना शस्त्रक्रियेआधी तपासणी चाचण्यांच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण पूर्ण करून, तंत्र आणि शस्त्रक्रिया पध्दती, शस्त्रक्रिया कामगिरी आणि तिचे व्यवस्थापन त्यांच्या विशिष्ट शस्त्रक्रियेच्यावेळी देण्यात येईल आणि त्याच्या तंत्राची, पध्दतीची तपशीलवार माहिती आणि शस्त्रक्रियेचा तपशील सीसीआयएमने घालून दिलेल्या त्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाप्रमाणे नमूद करतील,नियमांप्रमाणे नाही. आताचे स्पष्टीकरण हे सर्वसाधारण जनहिताच्या दृष्टीने जाहीर करण्यात आले असून त्यांचे नियमन करण्यासाठी तयार केले आहे. याचाच अर्थ त्यात कोणतेही धोरणात्मक बदल नाहीत.
3. या अधिसूचनेतील आधुनिक परीभाषेबाबत वाद का आहे?
या अधिसूचनेतील आधुनिक परीभाषेबद्दल मंत्रालयाकडे कोणत्याही सूचना अथवा आक्षेप आलेले नाहीत आणि अशा विवादांबाबत मंत्रालयाकडे माहिती नाही.
तरीही हे स्पष्ट करण्यात आले आहे, की सर्व वैज्ञानिक प्रगती ही तिच्या प्रमाणित परीभाषेसह वापरणे, हा मानवजातीचा वारसा आहे. ती परीभाषा कोणत्याही एका व्यक्तिची अथवा समूहाची मक्तेदारी नाही. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक संज्ञा या अस्थायी दृष्टीकोनातून आधुनिक नसून त्या मोठ्या प्रमाणावर ग्रीक, लॅटीन अगदी संस्कृत अशा प्राचीन भाषांतून आणि नंतर अरेबिक भाषेतून आलेल्या आहेत. परीभाषा विकसित करणे ही गतिशील आणि सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. आधुनिक वैद्यकीय संज्ञा आणि परीभाषा ही चिकित्सकांमधेच नव्हे तर सर्वसामान्य जनतेसह इतर हितसंबंधितांशी संवाद आणि व्यवहार सुलभतेने करायला मदत करते. या तातडीच्या अधिसूचनेद्वारे आधुनिक संज्ञांचा वापर केला आहे कारण हे सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर समजावे, तसेच त्या संबंधित क्षेत्रे जसे की, वैद्यकीय कायदे, आरोग्य माहिती-तंत्रज्ञान या सारख्या क्षेत्रांसह सामान्य व्यक्तींनाही समजावे.
4. या अधिसूचनेतील काही आधुनिक संज्ञा या आयुर्वेदिक आणि पारंपरिक (आधुनिक)वैद्यक शास्त्रात मिश्रित झाल्या आहेत का?
अजिबात नाही. सर्व आधुनिक परीभाषेचा उद्देश, विविध हितसंबंधितांमधील संभाषण आणि संवाद सुलभ पध्दतीने व्हावे यासाठी आहे. या अधिसूचनेतील हितसंबंधीत हे केवळ आयुर्वेद चिकित्सक आहेत असे नाही तर इतर हितसंबंधीत व्यावसायिक उदाहरणार्थ वैद्यकीय कायदे, आरोग्य तंत्रज्ञान, विमा व्यावसायिक त्याचप्रमाणे सामान्य जनतेचे प्रतिनिधी देखील आहेत. यासाठी आधुनिक परीभाषा वापरण्याची आवश्यकता होती. आयुर्वेदात पारंपरिक वैद्यक शास्त्र मिसळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण सीसीआयएम भारतीय वैद्यक शास्त्रांची प्रामाणिकता टिकवण्यासाठी मनापासून वचनबद्ध आहे आणि अशा प्रकारच्या मिश्रणाविरुध्द आहे.
***
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674956)
Visitor Counter : 443