पंतप्रधान कार्यालय
पंडित दिनदयाल उपाध्याय पेट्रोलिअम विद्यापीठ, गांधीनगरच्या 8 व्या दीक्षांत सोहळ्यासाठी पंतप्रधान 21 नोव्हेंबर रोजी सहभागी होणार
Posted On:
19 NOV 2020 8:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंडित दिनदयाल उपाध्याय पेट्रोलिअम विद्यापीठाच्या 8 व्या दीक्षांत सोहळ्यात 21 नोव्हेंबर रोजी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सकाळी 11:00 वाजता सहभागी होणार आहेत. या दीक्षांत सोहळ्यादरम्यान 2600 विद्यार्थ्यांना पदवी/पदविका प्राप्त होणार आहे.
दीक्षांत सोहळ्याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते ’45 मेगावॅट मोनोक्रिस्टलीय सौरऊर्जा केंद्र’ आणि ‘जलतंत्रज्ञनासंबंधीचे उत्कृष्टता केंद्र’ याचा पायाभरणी सोहळा होणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते पंडित दिनदयाल पेट्रोलिअम विद्यापीठात ‘इनोवेशन अँड इनक्युबेशन सेंटरतंत्रज्ञान व्यापार इनक्युबेशन’, ‘भाषांतर संशोधन केंद्र’ आणि ‘क्रीडा संकुलाचे’ उद्घाटन करण्यात येणार आहे.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674167)
Visitor Counter : 179
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam