शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. रमेश पोखरीयाल नि:शंक यांना "वातायन जीवनगौरव " पुरस्काराने सन्मानित करणार

Posted On: 19 NOV 2020 7:38PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. रमेश पोखरीयाल नि:शंक यांना  दिनांक  19 नोव्हेंबर 2020 रोजी वातायन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा   पुरस्कारइतर   अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीप्रमाणे आपल्या काव्यलेखन आणि इतर साहित्यिक योगदानासाठी मंत्री महोदयांना सन्मानित करणारा आणखी एक पुरस्कार आहे.श्री. पोखरीयाल यांना यापूर्वी साहित्य क्षेत्रातील तसेच प्रशासनातील अनेक पुरस्कार मिळाले असून त्यात, तत्कालीन  पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते दिला गेलेला  साहित्य भारती पुरस्कार , माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिला गेलेला साहित्य  गौरव सन्मान पुरस्कार ,दुबई सरकारचा सुशासन पुरस्कार, माँरीशसतर्फे वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल दिला जाणारा ग्लोबल आँरगनायझेशन ऑफ पर्सन ऑफ इंडियन ओरीजीन  हा पुरस्कार  तसेच युक्रेन ने दिलेला पर्यावरण विषयक कार्याबद्दल चा पुरस्कार हे त्यापैकी काही पुरस्कार आहेत. श्री. नि:शंक यांना नेपाळने हिमालय पुरस्कार ही दिला आहे.

श्री.नि:शंक यांच्या जस्ट अ डिझायर या कथासंग्रहाची जर्मन आवृत्ती  ''नुरीनवंस '' नावाने हँम्बर्गच्या  अँफ्रो एशियन इन्स्टिट्यूटने प्रकाशित केली आहे. त्यांच्या स्पर्श गंगा या उपक्रमाचा माँरीशसच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश केला आहे. ते स्वर्णगंगा या  सारख्या अनोख्या सामाजिक चळवळीत  सक्रियपणे सहभागी आहेत.  श्री. नि:शंक यांनी उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक मंत्री म्हणून जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

श्री. पोखरीयाल यांना  डॉक्टरल पदवीउत्तराखंडमधील ग्राफिक इरा स्वायत्त विद्यापीठाच्या डी.लीट मानद पदवीसह  साहित्य क्षेत्रातील अनेक पदव्या प्राप्त झाल्या आहेत.

श्री. पोखरीयाल यांनी 75 पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले असून त्यांचे अनेक भारतीय तसेच परदेशी भाषांत अनुवाद झाले आहेत. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी  नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीच्या विविध  प्रकियेना चालना दिली त्याची जगभरात प्रशंसा होत आहे.

वातायन आंतरराष्ट्रीय पुरस्कार  हा लंडनमधील  यूके-वातायन संस्थाकवी,लेखक आणि कलाकर्मींना त्यांच्या श्रेष्ठ कार्यासाठी  देऊन सन्मानित करत  असते.यापूर्वी  प्रसून जोशी, जावेद अख्तर यासारख्या दिग्गजांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल वातायन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

दिनांक 21 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 8वाजता हा समारंभ द्रुकश्राव्य माध्यमातून आयोजित केला जाणार आहे. लंडनच्या नेहरू केंद्राचे संचालक आणि प्रख्यात लेखक  डॉ. अमीष त्रिपाठी हे या समारंभात विशेष अतिथी म्हणून उपस्थित  रहाणार आहेत.वातायनच्या अध्यक्ष मीरा कौशिक, आग्रा केंद्रीय हिंदी मंडळाचे उपाध्यक्ष कवी अनिल शर्मा जोशी आणि वाणी प्रकाशनाच्या कार्यकारी संचालिका आदिती माहेश्वरी हे देखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

 

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674131) Visitor Counter : 164