राष्ट्रपती कार्यालय
छटपूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
19 NOV 2020 6:25PM by PIB Mumbai
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी छटपूजेच्या पूर्वसंध्येनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“छटपूजेच्या पवित्र सणांनिमित्त, मी भारत आणि परदेशात असलेल्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो
छटपूजेला सूर्यदेवाची पूजा-अर्चना करण्याची पद्धत आहे. तसेच नद्या, समुद्र, तलाव अशा जलाशयांमध्ये अर्घ्य अर्पण करुन निसर्ग देवतेप्रती यानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली जाते.
छटपूजेच्या या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निश्चय करुया तसेच कोविडचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेऊन हा उत्सव साजरा करुया. ‘छट माता’ सर्व नागरिकांना आरोग्य आणि समृद्धीचे वरदान देवो, हीच प्रार्थना!” असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674080)
Visitor Counter : 123