पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 नोव्हेंबर 2020 रोजी तिसऱ्या वार्षिक ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमला संबोधित करणार

Posted On: 17 NOV 2020 1:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  17 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 नोव्हेंबर 2020 रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता तिसऱ्या वार्षिक ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमला संबोधित करणार आहेत.

मायकेल ब्लूमबर्ग यांनी 2018 मध्ये ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमची स्थापना केली होती. फोरमचे उद्‌घाटन सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि दुसरे वार्षिक फोरम बीजिंगमध्ये आयोजित केले गेले होते. यामध्ये जागतिक आर्थिक व्यवस्थापन, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, शहरीकरण, भांडवली बाजार, हवामान बदल आणि समन्वय यासह अनेक विषयांचा समावेश होता.

यावर्षी, कोविड -19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासंदर्भात तसेच भविष्याविषयक योजनांविषयीच्या चर्चा या मंचाच्या केंद्रस्थानी असतील.

 

U.Ujgare/S.Tupe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673408) Visitor Counter : 222