राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींकडून दिवाळीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 13 NOV 2020 8:01PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला  देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मी देशवासियांना आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो.

विविध धर्म आणि पंथांचे लोक हा सण साजरा करतात ज्याद्वारे आपल्या देशातील लोकांमधील ऐक्य, सद्भावना आणि बंधुत्वाची भावना दृढ होते. हा सण आपल्याला मानवतेच्या सेवेसाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करतो.

आपण असा संकल्प करू कि ज्याप्रकारे एक तेवणारा दिवा जसा अनेक दिव्यांना प्रज्वलित करू शकतो त्याप्रमाणे आपण समाजातील गरीब, आश्रित आणि गरजू लोकांच्या आयुष्यात समृद्धी आणि आशेचा दिवा बनून सुखाचे क्षण वाटूया. दिवाळी हा सण स्वच्छतेचा देखील आहे, त्यामुळे चला भूमातेचा सन्मान करण्यासाठी प्रदूषणमुक्त, पर्यावरण स्नेही आणि स्वच्छ दिपावली साजरी करूया.

प्रार्थना करतो की, देशातील प्रत्येक आणि प्रत्येक घरात हा आनंदाचा आणि तेजोमय दिव्यांचा उत्सव, शांतता आणि भरभराटीचा देवो.`` .

--

Jaydevi PS/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1672746) आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu