उपराष्ट्रपती कार्यालय

दीपावलीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 13 NOV 2020 6:38PM by PIB Mumbai

 

दीपावलीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपराष्ट्रपतींचा शुभेच्छा संदेश पुढीलप्रमाणे :

दिपावली / दिवाळी - दिपोत्सवा निमित्त मी देशातील आणि परदेशातील माझ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा  देतो.

पारंपारिक उत्साह आणि आनंदाने साजरा केला जाणार दीपावलीचा सण, वाईटावर चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतीक आहे आणि भगवान राम यांच्या जीवनातील उदार आदर्श आणि सद्गुणांवरील आपल्या विश्वासाची पुष्टी करतो.

दीपावलीचा उत्सव भारताच्या बाहेरही मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. जगातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे असेही म्हणता येईल. परदेशात राहणारे भारतीय दीपावली सण खूप उत्साहात आणि प्रेमाने साजरा करतात.

रावणाला पराभूत केल्यानंतर याच दिवशी श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह 14 वर्षांच्या वनवासातून अयोध्येत परत आले.  आपण आसुरी शक्तींना सतत दडपून ठेवण्याची आणि समाजात चांगुलपणा आणि सुसंवाद वाढवण्याची आवश्यकता आहे, याची हा सण आपल्याला आठवण करून देतो.

दीपावलीच्या रात्री समृद्धीची देवी, लक्ष्मी देवीची पूजा करणे देखील या सणातील मुख्य विधी आहे.

दीपावली हा सण कुटुंब आणि मित्र परिवार एकत्र येऊन साजरा करण्याचा उत्सव आहे. परंतु यावर्षी कोविड -19 च्या संसर्गामुळे आपल्याला आरोग्य आणीबाणीचा सामना करावा लागला आहे. ते लक्षात घेता, कोविडशी संबंधित आरोग्य आणि स्वच्छता प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करून दीपावलीचा सण साजरा करण्याचे मी नागरिकांना आवाहन करतो.

 

Jaydevi PS/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672696) Visitor Counter : 126