अर्थ मंत्रालय

अर्थ मंत्रालयाने वार्षिक अर्थसंकल्प 2021–22 साठी मागविल्या कल्पना/सूचना/प्रस्ताव

Posted On: 13 NOV 2020 6:32PM by PIB Mumbai

 

वार्षिक अर्थसंकल्पातील तरतूदींमध्ये समाविष्ट करण्यासाठी नवनवीन कल्पना शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून अर्थ मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी , नॉर्थ ब्लॉकमध्ये  देशातील प्रमुख उद्योग / वाणिज्य संघटना, व्यापार संस्था आणि तज्ज्ञ यांच्यासमवेत पूर्व अर्थसंकल्पीय सल्लामसलत केली जाते.  देशातील सध्याची महामारीची परिस्थिती लक्षात घेता, मंत्रालयाला अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत वेगळ्या स्वरूपात घेण्याची विनंती संबंधित घटकांनी केली होती. त्यानुसार विविध संस्था/तज्ज्ञांकडून सूचना प्राप्त करण्यासाठी एक समर्पित ई-मेल तयार करण्याचा निर्णय  अर्थ मंत्रालयाने घेतला  आहे. या संदर्भात विशिष्ट संप्रेषण लवकरच पाठविले जाईल.

2021- 22 ची  वार्षिक अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत अधिक  सहभागात्मक आणि लोकशाही पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून  देशातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी  सरकारने माय गव्ह (MyGov) प्लॅटफॉर्मवर एक मायक्रो-साइट(ऑनलाइन पोर्टल) तयार केले आहे, जे  येत्या 15 नोव्हेंबर 2020 पासूनअर्थसंकल्पासाठी येणाऱ्या सूचना   स्वीकारणार आहे.  या पोर्टलवर  , 2021 – 22 च्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांना वैयक्तिक पातळीवर त्यांच्या सूचना, कल्पना नोंदविता येतील. नागरिकांच्या सूचनांवर   पुढे सरकारच्या संबंधित मंत्रालय / विभागाकडून  अभ्यास केला जाईल. आवश्यकता भासल्यास, संबंधित नागरिकांना त्यांच्या ई-मेल / मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला जाईल, जो त्यांनी नोंदणी करताना  सादर केलेला असेल. नागरिकांना या पोर्टलवर  30 नोव्हेंबर 2020 पर्यंत कल्पना / सूचना / प्रस्ताव पाठवता येतील.

.....

Jaydevi PS/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1672691) Visitor Counter : 203