रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेच्या सर्व  रूग्णालयात रेलटेल’च्या माध्यमातून'" आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली "उपलब्ध  होणार

Posted On: 10 NOV 2020 10:29PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील सर्व रूग्णालयात अधिक चांगली, सुरळीत आरोग्य सुविधा देण्यासाठी "आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली" उपलब्ध करून  देण्याची जबाबदारी भारतीय रेलटेल महामंडळाकडे (रेलटेल)  सोपविण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये रूग्णालयाचे प्रशासन आणि रूग्णांना देण्यात येणा-या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी देशभरातल्या रेल्वेच्या 125 आरोग्य सुविधा केंद्र आणि 650 पॉलिक्लिनिक्स यांच्यासाठी   आरोग्यचाचण्या तस्साच  व्यवस्थापन माहिती प्रणाली " ही एकीकृत सुविधा  उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रूग्णालयांचे वेगवेगळे विभाग आणि प्रयोगशाळा   लागणारी वैद्यकीय माहिती स्वतंत्रपणे  देणे, विविध रूग्णालयांना  परस्पर  समन्वयाच्या मध्यातून  वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देणे, वैद्यकीय  साधने आणि सेवांबाबत सहज देवाणघेवाण व्हावी  यांच्यासाठी एक विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. यामुळे रूग्णांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय अहवाल मिळू शकणार आहेत. तसेच अशा वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालाबाबत योग्य ती गोपनीयता ठेवण्यात येणार आहे.

या सुविधा रूग्णांना कशा पद्धतीने द्याव्यात याविषयी रेलटेल आणि रेल्वे मंत्रालय यांच्यामध्ये सामंजस्य करारवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. एचएमआयएसहे सॉफ्टवेअर  मुक्त स्त्रोत संगणक प्रणाली असून रूग्णालय व्यवस्थापन  माहिती क्लाउडच्यासाठवण सेवेच्या  माध्यमातून मिळू शकणार आहे. सर्व्हिलन्स

देशभरातल्या रेल्वे रूग्णालयासाठी तयार केलेल्या रेलटेलयोजनेविषयी बोलताना भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही के यादव म्हणाले, रेल्वेच्या सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटायजेशन होत असून सातत्याने नवीन बदल घडत आहेत. एचएमआयएस ही  अतिशय वेगळी, उपयुक्त वैद्यकीय कार्यप्रणाली असून त्यात  कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित   तंत्रज्ञानाचा वापर  केला  आहे. यामध्ये डेटा विश्लेषणाच्या अॅप्लिकेशनवर आधारित सेवा दिली जाणार आहे. रेलटेलबरोबर  अ असलेली  धोरणात्मक भागिदारी गुणवत्तेवर आधारित आहे.  रेलटेल यापुढेही  ई-कार्यालयव्हिडिओ सर्व्हिलन्स   , देशातल्या  प्रमुख रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा  उपलब्ध करून देणे  यासारख्या विविध प्रकल्पात सहभागी आहे, असे यादव यांनी सांगितले.

रेलेटेलकडे सोपविण्यात आलेल्या या कार्याविषयी रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला म्हणाले, दक्षिण मध्ये रेल्वेच्या रूग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचे कार्य रेलटेलच्या माध्यमातून आधीच करण्यात येत आहे. आता यापुढे टप्प्या-टप्प्याने संपूर्ण देशामध्ये ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे. नेहमीच्या पद्धतीने  वैद्यकीय नोंदी काही अडचणी येतात तसेच त्याच्या काही  मर्यादाही आहेत. मात्र आता तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय नोंदी ठेवणे अधिक सोपे झाले आहे. नेहमीच्या पद्धतीने

रेलटेलच्यावतीने  एमपीएलएस- व्हीपीएन, लिज्ड लाइन सेवा या आयसीटी  सेवा, टीपास, ई-कार्यालय ,डाटा केंद्र सेवा, नेटवर्क हार्डवेअर एकात्मिक  प्रणाली, तसेच सॉफ्टवेअर आणि डिजिटल सेवा अशा विविध सेवा पुरवल्या जातात.

------

Jaydevi P S/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1671833) Visitor Counter : 201