संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचा हीरक महोत्सव
‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा-एक दशक पुढे’ या विषयावर दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन
मित्र देशांसाठी एनडीसी अधिक जागा उपलब्ध करणार
Posted On:
04 NOV 2020 8:19PM by PIB Mumbai
एनडीसी, म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आपला हीरक महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्त पाच आणि सहा नोव्हेंबरला एक विशेष वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा-एक दशक पुढे’ या विषयावर हे वेबिनार असेल अशी माहिती, संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि एनडीसी चे कमांडन्ट एअर मार्शल डी चौधरी यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
एन डी सी ही संस्था,लष्करातील निवडक वरिष्ठ अधिकारी तसेच भारत आणि परदेशातील सनदी अधिकारी यांना बौद्धिक विकास आणि रणनीतिक प्रशिक्षण देणाऱ्या जगातल्या अग्रणी संस्थांपैकी एक आहे, असे अजय कुमार यावेळी म्हणाले. या संस्थेचा पहिला अभ्यासक्रम 1960 साली झाला, ज्यात 21 जन सहभागी झाले होते. संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षात, 100 जणांना प्रशिक्षण देण्यात आले, ज्यात 75 भारतीय आणि 25 जण मित्र देशातील आहेत. हा लष्करी आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी उच्च व्यावसायिक प्रशिक्षण देणारा अत्यंत प्रतिष्ठीत अभ्यासक्रम आहे, असे कुमार यांनी सांगितले. या संस्थेतून प्रशिक्षित झालेल्या अनेक उच्चपदस्थ नामवंतांची नावे त्यांनी सांगितली. ज्यात, सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, दोन राज्यापाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, दोन निवडणूक आयुक्त, 30 भारतीय सनदी सेवा प्रमुख, 20 पेक्षा धिक राजदूत, चार संरक्षण सचिव, 5 परराष्ट्र सचिव यांचा सामावेश आहे.
परदेशातील अनेक प्रशिक्षणार्थीनी देखील आपापल्या देशात अत्यंत महत्वाची पडे भूषविली आहेत. यात त्या त्या देशातील लष्करी दलांचे प्रमुख असलेल्या 74 जणांचा समावेश आहे. या संस्थेतील काही माजी विद्यार्थी, ज्यांनी आपल्या देशात सर्वोच्च पदे भूषवली, त्यांची नावे :
1. महामहिम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, द किंग ऑफ भूटान
2. लेफ्टनंट जनरल हुसैन मुहम्मद इरशाद, माजी राष्ट्रपती, बांग्लादेश
3. लेफ्टनंट जनरल फ्रेडरिक विलियम क्वासी अकफू, माजी प्रमुख, घाना
आणखी एक माजी विद्यार्थी म्हणजे, माननीय सर पीटर कॉसग्रोव्ह ए के, हे ऑस्टेलियाचे माजी राष्ट्रकुल गव्हर्नर जनरल होते.
या दोन दिवसीय वेबिनारचा विषय ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा-एक दशक पुढे’ हा असून त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे या वेबिनारमध्ये बीजभाषण होईल. त्याशिवाय काही महत्वाचे वक्ते खालीलप्रमाणे :--:
- पीटर वर्गीस, चांसलर क्वींसलैंड विद्यापीठ
- सी राजमोहन, निदेशक, दक्षिण अशियाई विद्यापीठ,
- चीफ ऑफ डिफेंस स्टाफ
- परराष्ट्र सचिव
- द चीफ ऑफ आर्म्ड फोर्स
- रुद्र चौधरी, निदेशक, कार्नेगी इंडिया
- डॉ. शामिका रवि, ब्रुकिंग्स इंडिया
एनडीसी ही आज जगातल्या प्रसिद्ध, नामवंत संस्थापैकी एक आहे, असं अजय कुमार यावेळी म्हणाले. या संस्थेत प्रशिक्षणासाठी अधिक जागा असाव्यात अशी मागणी, इतर देशांकडून सातत्याने केली जाते, या विनंतीला मान देऊन, संरक्षण मंत्रालय, 2021 साली एनडीसी ची क्षमता 100 वरुन 110 पर्यंत आणि 2022 मध्ये 120 पर्यंत वाढवणार आहे, अशी माहिती अजय कुमार यांनी दिली. मित्र देशांसाठी अधिक जागा राखीव ठेवणे यामुळे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. नेपाळ, म्यानमां, बांगलादेश यांच्याशिवाय, उजबेकिस्तान, ताजिकीस्तान, फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांसाठी देखील काही जागा रखीव ठेवणार आहोत.
हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रपतींनी एनडीसी येथे राष्ट्रीय सुरक्षा आणि रणनीती यावर, उत्कृष्टता अध्यासन स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. हे अध्यासन 2021 पासून सुरु होईल. या प्रसंगी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते ‘एनडीसी-एबोड ऑफ स्ट्रैटेजिक एक्सलन्स’ या ई-पुस्तकाचे प्रकाशनही केले जाईल.
कोविड-19 च्या संकटकाळातही एनडीसीने आपला अभ्यासक्रम मार्च 2020 पासून सुरु ठेवला आहे. तसेच संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला, अशी माहिती एनडीसी चे कमांडन्ट एअर मार्शल डी चौधरी यांनी यावेळी दिली.
***
M.Iyengar/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670203)
Visitor Counter : 188