गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते शेजारील परिसर विकास आव्हान, डेटा मॅच्युरिटी नियमन आराखडा दुसरी फेरी आणि सीडी डेटा अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

Posted On: 04 NOV 2020 6:56PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांनी लहान बालके आणि कुटूंब अग्रस्थानी ठेऊन शेजारील परिसर विकसित करणे, शहरांच्या डेटा इकोसिस्टमचे मूल्यांकन करण्यासाठी डेटा मॅच्युरिटी नियमन आराखडा, आणि 100 स्मार्ट सिटीच्या सीटी डेटा अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम या तीन उपक्रमांचा आज शुभारंभ केला. एमओएचयुए सचिव दुर्गा शंकर मिश्र आणि वरिष्ठ अधिकारी आणि भागधारकांची याप्रसंगी उपस्थिती होती.

शेजारील परिसर विकसित करणे आव्हान हा तीन वर्षासाठीचा उपक्रम आहे, यात शहरांचा विकास, बालकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांच्या पालकांना आणि कुटुंबीयांना विविध उपाययोजना सादर करण्यात येतील. नेदरलँडसच्या बर्नार्ड वॅन लीर फाऊंडेशन आणि डब्ल्युआरआय इंडियाच्या मदतीने याचे आयोजन करण्यात येत आहे. या आव्हानांतर्गत निवडलेल्या शहरांना उद्याने आणि मोकळ्या जागांचा पुनर्विचार करण्यासाठी तांत्रिक सहाय्य आणि क्षमता वृद्धीसाठी सहकार्य; सार्वजनिक ठिकाणी बालकांसाठी सोयीसुविधा आणि सुरक्षित आणि चालण्यायोग्य रस्ते तयार करण्यासाठी सहाय्य करण्यात येणार आहे. हे आव्हान सर्व स्मार्ट सिटींसाठी, पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्यांसाठी खुले आहे.

***

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670140) Visitor Counter : 179