राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

Posted On: 31 OCT 2020 2:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2020

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (31.10.2020) राष्ट्रपती भवनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली. राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिका-यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.

त्यापूर्वी आज सकाळी राष्ट्रपती कोविंद यांनी नवी दिल्लीतल्या सरदार पटेल चौकातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यासमोर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

 

* * *

S.Tupe/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669055) Visitor Counter : 114