युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

ऑलिम्पिक 2024 चे प्रशिक्षणा सुरू करण्यासाठी 96 टक्के खेळाडू एसएआय, एनसीओईच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये दाखल

Posted On: 29 OCT 2020 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2020

देशभरात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांमध्ये (NCOE) पुन्हा क्रीडा विषयक उपक्रम सुरू झाल्यामुळे, 2024 च्या ऑलिम्पिक्समधील क्रीडा प्रशिक्षण घेण्यासाठी 96 टक्के प्रशिक्षणार्थी औरंगाबाद, भोपाळ, बंगळुरू, दिल्ली, लखनऊ, रोहतक आणि सोनपत येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये दाखल झाले आहेत. यापूर्वी जेव्हा प्रशिक्षण शिबिरे पुन्हा सुरू झाली होती, तेव्हा जे खेळाडू आगोदरच टोकियो ऑलिम्पिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरले होते, ते संबंधित एनसीओई आणि एसटीसीमध्ये सामील झाले होते. जे खोळाडू प्रशिक्षण शिबिरांमध्ये  दाखल होणार आहेत, त्यांना विलगीकरणात राहणे सक्तीचे आहे आणि आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. काही प्रशिक्षणार्थी तातडीने दाखल होऊ शकत नाहीत आणि ते दिवाळीनंतर दाखल होऊ शकतील. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशिक्षणार्थींनी एकदा एनसीओईमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना शिबिरातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही. म्हणून, खेळाडूंना 1 नोव्हेंबर 2020 रोजी किंवा दिवाळीनंतर प्रशिक्षण केंद्रांमध्ये दाखल होण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

खेळ पुन्हा सुरू करण्याच्या या टप्प्याबाबत बोलताना, केंद्रिय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री श्री किरेन रिजीजू म्हणाले, आमचे टोकयोला गेलेले खेळाडू आगोदरपासूनच प्रशिक्षण घेत आहेत आणि मला आनंद आहे की या टप्प्यातही अनेक खेळाडू शिबिरात सहभागी झाले आहेत. यावरून असे दिसते की खेळाडूंना एसएआयने क्रीडा विषयक उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या मानक कार्यपद्धतीबाबत विश्वास आहे  आणि म्हणून ते मोठ्या उत्साहाने प्रशिक्षण शिबिरांमध्ये आता दाखल होत आहेत. आपल्या खेळाडूंची सुरक्षा ही महत्त्वाची प्राथमिकता आहे आणि प्रशिक्षण काळात सुरक्षित वातावरण मिळेल याची खात्री देण्यासाठी सर्व योग्य त्या उपाययोजना करण्यात आली आहे. 

प्रशिक्षणस्थळी सुरक्षेबाबतची खबरदारी विस्तृतपणे घेत असतानाचखेळाडू बाहेरील लोकांच्या संपर्कात येऊ नयेत, त्यासाठी खेळाडूंना नेमून दिलेले रंग आणि केंद्रातील परिसर ठरवून देण्यात आले आहेत, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि राज्य सरकारच्या आरोग्य नियमावलीनुसार सर्व सुरक्षा विषयक उपाययोजना केल्या जात आहेत जेणएकरून प्रशिक्षणार्थींना राहण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी सुरक्षित वातावरण आहे हे सुनिश्चित केले जात आहे.

याव्यतिरिक्त, एसएआय अधिकाऱ्यांनी सर्व खेळाडू आणि त्यांचे पालक यांच्याकडे एसएआय केंद्रामध्ये जाण्यापूर्वी आणि त्यानंतरही मानक कार्यपद्धतीबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्या खेळाडूंनी आणइ पालकांनी संपर्क साधला आहे त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी केलेल्या योग्य उपायांबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दर्शविली आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने खेळाडू आणि त्यांच्या एनसीओई किंवा एसएआय केंद्रांपर्यंत जाण्यासाठी प्रशिक्षणार्थींसाठी वाहतुकीची व्यवस्था केली आहे. ज्या खेळाडूंना 500 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करावयाचा आहे त्यांना विमान प्रवासाचे तिकीट दिली जाते तर 500 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या खेळाडूंसाठी तृतीय श्रेणी वातानूकुलित शयनयानाची सुविधा असलेल्या रेल्वेने प्रवास करू शकतात.

 

B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1668911)