सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केव्हीआयसीकडून दिवाळीसाठी उच्च दर्जाचे मलमल कापडाचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध
Posted On:
30 OCT 2020 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2020
यंदाचा दिवाळी उत्सव सजवा खादीच्या पांढऱ्या शुभ्र आणि चकाकत्या लाल रंग संगतीमधील नवीन फेसमास्कसह.आगामी दिवाळीचा सण लक्षात घेऊन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) पश्चिम बंगालमधील पारंपरिक खादी कलाकारांकडून दोन पदरांचा अस्सल मलमलच्या कापडाचा, उच्चप्रतीचा आणि अति बारीक धाग्यांचा (अल्ट्रा फाइन) हाताने तयार केलेला “Happy Diwali” असा छापील अक्षरांचा मास्क तयार केला आहे.
केव्हीआयसी नाताळ आणि नवीन वर्षासाठी देखील विशेष मास्क येत्या काही दिवसांतच तयार करणार आहे.
दोन पदरी खादी कापडाचे आणि सिल्क तीन पदरांचे मास्क यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मलमलच्या कापडाचे खादीचे मास्क विकसित करण्यात आले आहेत. केव्हीआयसीने आतापर्यंत देशभरात सहा महिन्यांपेक्षा कमी काळात 18 लाखांपेक्षा अधिक खादीच्या मास्कची विक्री केली आहे.
दिवाळीसाठीचे मलमल फेसमास्क हे नाममात्र 75 रुपये किमतीचे आहेत आणि ते दिल्लीमधील खादी केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि केव्हीआयसीच्या www.khadiindia.gov.in या ई-पोर्टलवर देखील ऑनलाइन पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
वेगवेगळ्या प्रकारच्या खादी मास्क सारखे, मलमलचे फेसमास्क देखील त्वचेसाठी चांगले, धुण्यायोग्य, पुनर्वापरास योग्य आणि जैव पद्धतीने विल्हेवाट लावण्या योग्य आणि आर्थिकदृष्ट्या सर्वांच्या खिशाला परवडणारे आहेत.
हे मास्क दोन पदरी संपूर्ण मलमलच्या धाग्यात बनलेले शुभ्र पांढऱ्या रंगाचे आहेत. मास्कवर चकाकणारी लाल रंगाची पाइपिंग पद्धतीची रचना करण्यात आली आहे, जी उत्सवाच्या कपड्यांवर शोभून दिसते.
केव्हीआयसीचे अध्यक्ष श्री विनय कुमार सक्सेना म्हणाले, दोन पदराचे दिवाळीसाठीचे फेसमास्क हे कमी किंमतीचे मात्र उच्च प्रतीचे आहेत. उत्सव साजरा करतांना सध्याच्या महामारीच्या काळात रोगाच्या प्रसारापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी केव्हीआयसीचा हा आणखी एक प्रयत्न आहे.
नागरिकांचा रोगाचा प्रसारापासून बचाव करण्याबरोबरच, हे मास्क अधिकाधिक पारंपरिक कसे दिसतील, यासाठी केव्हीआयसी प्रयत्न करीत आहे. यापूर्वी असलेल्या खादी आणि सिल्कच्या मास्कच्या वैविध्यामध्ये आता हे मलमलच्या कापडाचे मास्क भर घालीत आहेत. त्याचवेळी खादी कामगारांना यामुळे अतिरिक्त काम मिळत असल्याचे सक्सेना म्हणाले.
मलमलचे कापड मास्क निर्मितीसाठी निवडले गेले आहे कारण यामुळे मास्कच्या आतल्याबाजूला आर्द्रता टिपली जाते, तसेच हवा देखील सहजपणे खेळती राहू शकते. हे मास्क अधिक खास बनविले जातात, ते हाताने विणलेल्या आणि सुती कापडाचे जे त्वचेसाठी अत्यंत मऊ असतात आणि दीर्घ कालावधीसाठी वापरण्यास सोयीस्कर असतात.
B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668894)
Visitor Counter : 250
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam