राष्ट्रपती कार्यालय
मिलाद- उन- नबी निमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
29 OCT 2020 10:05PM by PIB Mumbai
राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी `मिलाद-उन-नबी`च्या पूर्वसंध्येला आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे –
``ईद-ए-मिलाद किंवा मिलाद-उन-नबी म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या पैगंबर महमंद यांच्या जन्मदिनानिमित्त मी आपल्या सर्व देशबांधवांना विशेषतः आपल्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना, शुभेच्छा देतो.
पैगंबर महंमद यांनी परस्पर प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देऊन जगाला माणुसकीचा मार्ग दाखविला आहे. त्यांना समानता आणि एकतेचा समाज निर्माण करायचा होता.
पवित्र कुराणात संकलित केलेल्या पैगंबर महंमद यांच्या शिकवणुकीनुसार आपण सर्वजण देशाचे कल्याण आणि शांतता व सौहार्दासाठी कार्य करूया.``
..
B.Gokhale/S.Sheikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1668700)
आगंतुक पटल : 206