संरक्षण मंत्रालय

लष्कराच्या इंटरनेट वापरासाठी  सिक्युअर अप्लिकेशन (एसएआय) विकसित

Posted On: 29 OCT 2020 4:17PM by PIB Mumbai

 

`आत्मनिर्भर भारत `साठी काही करण्यायोग्य अशा रितीने, भारतीय लष्कराने ``सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (एसएआय)`` नावाचा एक साधा आणि सुरक्षित मेसेजिंग अप्लिकेशन विकसित केला आहे. हा अनुप्रयोग (अप्लिकेशन) इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइट पद्धतीच्या यंत्रणेसाठी शेवटपर्यंत सुरक्षित व्हॉईस, मेसेज आणि व्हिडिओ कॉलिंग सेवेचे समर्थन  करतो. हे मॉडेल वॉट्सअप, टेलिग्राम, संवाद (SAMVAD) आणि जीआयएमएस या सारख्या व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या मेसेजिंग अप्लिकेशन सारखे असुन ते एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन मेसेजिंग पद्धतीचा अवलंब करते. स्थानिक सर्व्हर आणि कोडिंगसह, जे आवश्यकते नुसार काढूनही टाकता येऊ शकते, सुरक्षेच्या बाबतीत एसएआयची गुणवत्ता अधिक चांगली आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

सीईआरटीची अंतर्गत तपासणी समिती आणि आर्मी सायबर ग्रुप यांनी या अप्लिकेशनची तपासणी केली आहे. बौद्धिक संपत्ती हक्क (आयपीआर) दाखल करणे, एनआयसीवर (NIC) पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि आयओएस पद्धतीसाठी काम करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. सेवा काळात सुरक्षित मेसेजिंग पद्धत सुलभ करण्यासाठी संपूर्ण लष्करात एसएआय चा वापर केला जाईल.

या अप्लिकेशनच्या वापर पद्धतीचा आढावा घेतल्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी कर्नल साई शंकर यांचे कौशल्य आणि अप्लिकेशन विकसित करण्याच्या कल्पनेचे कौतुक केले.

****

B.Gokhale/S.Sheikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1668412) Visitor Counter : 235