संरक्षण मंत्रालय

संरक्षण निर्यातीला चालना : संयुक्त उत्पादन आणि परस्परांशी व्यापाराद्वारे संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्याला भारत- युएई यांची मान्यता

प्रविष्टि तिथि: 28 OCT 2020 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2020

 

संरक्षण निर्यातीला चालना देण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरात, युएई यांनी वेबिनार आयोजित केला होता. सहकार्यात्मक भागीदारीसाठी भारतीय संरक्षण उद्योगाची जागतिक व्याप्ती: वेबिनार आणि प्रदर्शन भारत - युएई संरक्षण सहकार्य अशी या वेबिनारची संकल्पना होती. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाने सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्यूफ्याक्चर, एसआयडीएम द्वारे  27 ऑक्टोबर 2020 ला  याचे आयोजन केले होते. 

दोन्ही देशांचे राजदूत आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या वेबिनारमधे सहभागी झाले, उभय देशातल्या दृढ संबंधांचा उल्लेख त्यांनी केला. संयुक्त उत्पादन आणि परस्परांच्या व्यापारातून संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याला दोन्ही बाजूंनी मान्यता दिली. आत्मनिर्भर भारत अभियानाचा  भाग म्हणून फक्त स्वदेशी मालाला संरक्षण देण्याची आमची भूमिका नसून खुलेपणा आणि परस्पर संबंधावर आम्ही भर देत आहोत ज्यामुळे आमच्या कंपन्या  जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनतील आणि भारतीय संरक्षण उत्पादन परीरचनेत विदेशी कंपन्यांची भूमिका राहील असे  संरक्षण उत्पादन विभागाचे सहसचिव संजय जाजू यांनी स्पष्ट केले. 

हे वेबिनार, संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि येत्या पाच वर्षात 5 अब्ज डॉलर्स मूल्याच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मित्र राष्ट्रांसमवेत आयोजित करण्यात  आलेल्या वेबिनार मालिकेचा एक भाग होते.  

एल अँन्ड टीडिफेन्स,जीआरएसई,ओएफबी,एमकेयु, भारत फोर्ज, अशोक लिलॅन्ड,या कंपन्यांनी रडार, संरक्षित वाहने, किनारी टेहळणी यंत्रणा,आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, दारुगोळा यासारख्या साहित्याबाबत सादरीकरण केले. युएईकडून एसटीआरईआयटी समूह, रॉकफोर्ड, इडीजीई यासारख्या कंपन्यांनी सादरीकरण केले. 

180 हून जास्त सहभागी  या वेबिनारला उपस्थित होते तर 100 पेक्षा जास्त आभासी प्रदर्शन स्टाल या प्रदर्शनात लावण्यात आले  होते. 

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1668131) आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Tamil , Telugu , Malayalam