पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते गुजरात येथे तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी “किसान सर्वोदय योजने’चे उद्घाटन
यु एन मेहता हृदयरोगशास्त्र संस्था आणि संशोधन केंद्राशी संलग्न बालहृदय रूग्णालयाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
गिरनार येथील रोपवे चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
24 OCT 2020 4:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून गुजरात मधील तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना 16 तास वीज पुरवठा करणाऱ्या “किसान सूर्योदय योजने’चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यु एन मेहता हृदयरोगशास्त्र संस्था आणि संशोधन केंद्राशी संलग्न बालहृदय रूग्णालयाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. याचवेळी, अहमदाबाद इथल्या शासकीय रूग्णालयात टेली-हृद्योपचार सेवेच्या मोबाईल अॅपचेही उद्घाटन पंतप्रधानांनी केले.
त्याशिवाय गिरनार येथे नव्या रोपवे चे ही त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गुजरात, सर्वसामान्यांच्या दृढनिश्चय आणि समर्पणासाठी नेहमीच एक अनुकरणीय आदर्श आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. सुजलाम-सुफलाम आणि सौनी योजनेनंतर किसान सूर्योदय योजना गुजरातच्या शेतकर्यांच्या गरजा भागवण्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरला आहे. असेही त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये वर्षानुवर्षे वीज क्षेत्रात केलेली कामे या योजनेचा आधार बनली आहेत, असंही पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले की, राज्यातील क्षमता सुधारण्यासाठी वीज निर्मितीपासून पारेषणपर्यंतची सर्व कामे मिशन पद्धतीने केली गेली. 2010 मध्ये जेव्हा पठाणमध्ये सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले तेव्हा भारत जगाला "वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड" चा मार्ग दाखवेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती, गेल्या काही वर्षात सौर उर्जा क्षेत्रात भारत आता जगात 5व्या स्थानावर पोहोचला आहे आणि वेगाने प्रगती करीत आहे याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.
किसान सूर्ययोदय योजनेबद्दल पंतप्रधान म्हणाले, पूर्वी बहुतेक शेतकऱ्यांना केवळ रात्रीच सिंचनासाठी वीज उपलब्ध होत असे त्यामुळे त्यांना रात्रभर जागे राहावे लागत असे.
गिरनार आणि जुनागडमध्येही शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची समस्या भेडसावत आहे. किसान सूर्ययोदय योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पहाटे 5 ते 9 या वेळेत 3 टप्प्यात वीजपुरवठा होईल आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन पहाट येईल.
अन्य विद्यमान यंत्रणेवर परिणाम न करता, प्रसारणाची पूर्णपणे नवीन क्षमता तयार करून हे काम करण्यासाठी गुजरात सरकारने केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या योजनेअंतर्गत, पुढील 2 – 3 वर्षांत सुमारे 3500 सर्किट किलोमीटर नवीन ट्रान्समिशन लाइन टाकल्या जातील आणि हजार पेक्षा अधिक गावांमध्ये येत्या काही दिवसांत याची अंमलबजावणी करण्यात येईल आणि यातील बहुतेक गावे आदिवासीबहुल भागात आहेत. या योजनेच्या माध्यमातून जेव्हा संपूर्ण गुजरातला वीज पुरवठा मिळू शकेल, तेव्हा लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलून जाईल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी, त्यांची गुंतवणूक कमी करून आणि त्यांच्या अडचणींवर मात करून, बदलत्या काळाच्या अनुषंगाने सातत्याने काम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून पुढाकार घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची यादी त्यांनी दिली, जसे, हजारो शेतकी उत्पादक संस्थांची निर्मिती करणे, कडुनिंबाच्या लेपनाचा युरिया, मृदा आरोग्य कार्ड आणि नव्या अनेक उपक्रमांचा प्रारंभ. ते म्हणाले, कुसुम (KUSUM) योजना, शेतकी उत्पादक संस्था, पंचायती आणि सर्व अशा प्रकारच्या संघटना यांनी नापीक जमिनीवर छोटे लौप प्रकल्प उभारण्यासाठी मदत केली आहे आणि शेतकऱ्यांचे सिंचन पंप सौर ऊर्जेशी जोडलेले आहेत. ते म्हणाले की यातून निर्माण होणारी वीज त्यांच्या शेती सिंचनासाठी वापरली जाईल आणि ती अतिरिक्त वीज ते विकू शकतील.
सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या क्षेत्रातही पूर्ण क्षमतेने गुजरातने प्रशंसनीय कामगिरी केली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की फक्त लोकांना पाणी मिळावे यासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत होता आणि ज्या जिल्ह्यात पूर्वी कल्पनाही केली नव्हती अशा जिल्ह्यांमध्ये आज पाणी पोहोचले आहे. सरदार सरोवर प्रकल्प आणि वॉटर ग्रीड्स या प्रकल्पांबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला ज्यामुळे गुजरातच्या दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचण्यास मदत झाली. ते म्हणाले की, गुजरात मधील 80 टक्के कुटुंबांनी पिण्याचे पाणी जलवाहिनीद्वारे घेतले आहे आणि लवकरच गुजरात असे राज्य असेल जेथे प्रत्येक घरात पिण्याचे पाणी असेल. किसान सूर्योदय योजनेचे उद्घाटन होत असल्यामुळे पर ड्रॉप मोअर क्रॉप (प्रत्येक थेंबागणिक पिक) या उक्तीचा पुनरुच्चार करण्याचे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. ते म्हणाले की दिवसा वीजपुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन उभारण्यास मदत होईल आणि किसान सूर्योदय योजना राज्यात सूक्ष्म सिंचन वाढीस मदत करेल.
आज सुरू झालेल्या यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी रिसर्च अँड सेंटरचा संदर्भ देताना ते म्हणाले की जागतिक स्तरीय पायाभूत सुविधा तसेच आधुनिक आरोग्य सुविधा असणारी देशातील काही रुग्णालयांपैकी ही एक सेवा आणि हे भारतातील सर्वांत मोठे ह्रदय विकारांबाबतचे रुग्णालय असेल. ते म्हणाले, आधुनिक रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रत्येक गावाला चांगल्या आरोग्य सुविधांशी जोडण्याचे गुजरातने कौतुकास्पद काम केले आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गुजरातमधील सुमारे 21 लाख लोकांनी मोफत उपचार घेतले आहेत. गुजरातमध्ये 525 पेक्षा अधिक जन औषधी केंद्र कमी दरातील औषधे उपलब्ध करून देतात आणि त्यापलकिडे, गुजरातमधील सामान्य लोकांना वाचविण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
पंतप्रधान म्हणाले की गिरनार पर्वत म्हणजे मा अंबे यांचे निवासस्थान आहे. यामध्ये गोरखनाथ सुळका, गुरू दत्तात्रय सुळका आणि एक जैन मंदिर आहे. जागतिकस्तरावरील रोप – वे च्या उद्घाटनानंतर अधिकाधिक भाविक आणि पर्यटक येथे येतील, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, बनसकंठा, पावागड आणि सातपुडासह गुजरातमधील हा चौथा रोप वे असेल. ते म्हणाले की, हा रोप वे आता लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देईल आणि आर्थिक संधी निर्माण करून देईल. लोकांना इतक्या सोयी सुविधा पुरविणाऱ्या यंत्रणा इतके दिवस खोळंबून राहतात त्यामुळे, तेव्हा लोकांना होणाऱ्या अडचणींवर त्यांनी प्रकाश टाकला. पर्यटनस्थळे विकसित करून स्थानिकांना मिळणारा आर्थिक फायदा देखील त्यांनी सूचीबद्ध केला. त्यांनी शिवराजपूर समुद्रकिनाऱ्यासारख्या जागेबद्दल सांगितले, ज्याला निळ्या ध्वजाचे प्रमाणपत्र आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी मिळालू असून त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. त्यांनी अहमदाबादमधील कांकरिया तलावाचे उदाहरण दिले जेथे कोणीही जात नव्हते. आणि नूतनीकरणाच्या नंतर वर्षाकाठी सुमारे 75 लाख लोक तलावाला भेट देत आहेत आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या उदरनिर्वाहाचे स्त्रोत देखील बनले आहेत. ते म्हणाले, पर्यटन हे असे एक क्षेत्र आहे की ज्यासाठी गुंतवणूक कमी प्रमाणात करावी लागते. मात्र, त्यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतात. त्यांनी गुजरातमधील नागरिकांना आणि जगभर गुजरातचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या लोकांना गुजरातमधील विविध पर्यटनस्थळांची माहिती जगभर पोचविण्यासाठी आणि त्याच्या प्रगतीत हातभार लावण्यासाठी आवाहन केले.
पार्श्वभूमी:-
किसान सूर्योदय योजना
कृषी सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी, गुजरात सरकारने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच ‘किसान सूर्योदय योजने’ची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत वीजपुरवठा उपलब्ध होईल. ही योजना 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यासाठी पारेषण पायाभूत व्यवस्था उभारण्यासाठी, 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 66-किलोवॅट च्या 234 पारेषण वाहिन्या, ज्यांचे 3490 किलोमीटर लांबीचे सर्किट तयार केले जाईल त्याशिवाय, 220 KV ची वीज उपकेंद्रे तयार केली जातील.
वर्ष 2020-21 साठी दाहोड, पाटण, महिसागर, पंचमहाल, छोटा उदयपर, खेडा, तापी, वलसाड, आणंद आणि गिर-सोमनाथ या भागांत योजना राबवली जाणार आहे. उर्वरीत जिल्ह्यात 2022-23 मध्ये योजना राबवली जाईल.
यु एन मेहता हृदयरोगशास्त्र संस्था आणि संशोधन केंद्राशी संलग्न बालहृदय रूग्णालय
यु एन मेहता हृदयरोगशास्त्र संस्था आणि संशोधन केंद्राशी संलग्न बालहृदय रूग्णालयाचे आणि अहमदाबाद इथल्या शासकीय रूग्णालयात टेली-हृद्योपचार सेवेच्या मोबाईल ॲपचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या विस्तारामुळे, यु एन मेहता आरोग्यसंस्था हृदयरोग उपचारांसाठीची देशातली सर्वात मोठी संस्था ठरली आहे, तसेच जगातील, मोजक्या हृदयरोगशास्त्र विषयक रुग्णालयांमध्ये असलेल्या सर्वोत्तम सुविधा आणि उपचार देखील या रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.
यु एन मेहता हृदयरोगशास्त्र संस्थेच्या विस्तारीकरणासाठी 470 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येईल. खाटांची संख्या देखील, 450 वरून 1251पर्यंत वाढवली जाणार आहे. यामुळे ही संस्था या देशांतील सर्वात मोठी हृदयरोगशास्त्र विषयक शिक्षणसंस्था आणि जगातील सर्वात मोठ्या सुपर स्पेशालीटी रुग्णालयांपैकी एक होणार आहे.
या इमारतीसाठी भूकंपरोधी बांधकाम ,अग्नीरोधक व्यवस्था आणि फायर मिस्ट सारख्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. येथील संशोधन केंद्रात, देशातील पहिला अत्याधुनिक हृदयरोग अति दक्षता विभाग, फिरते आणि अशा सर्व अत्याधुनिक उपरकरण-सुविधांनी सज्ज शस्त्रक्रिया केंद्र, इत्यादी सुविधा असतील. त्याशिवाय 14 शस्त्रक्रिया केंद्र, 7 कॅथेटरिझेशन प्रयोगशाळा देखील सुरु होणार आहेत.
गिरनार रोपवे
पंतप्रधानांच्या हस्ते आज गुजरातच्या गिरनार मध्ये रोपवे च्या सुविधेचेही उद्घाटन झाले. या नव्या सुविधेमुळे, गुजरात पुन्हा एकदा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला, या रोपवे मध्ये 25 ते 30 केबिन्स असतील, ज्यांची क्षमता, प्रती केबिन/आठ व्यक्ती एवढी असेल. या रोपवे मुळे, 2.3 किलोमीटरचे अंतर केवळ 7.5 मिनिटात पार केले जाऊ शकेल. त्याशिवाय, या रोपवे मुळे, गिरनार पर्वतरांगांच्या हिरव्यागार निसर्गसौंदर्याचे दर्शनही पर्यटकांना होऊ शकेल.
B.Gokhale/S.Tupe/S.Sheikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667308)
Visitor Counter : 297
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam