केंद्रीय लोकसेवा आयोग

नागरी सेवा (प्रारंभिक) परीक्षा 2020 चा  निकाल

Posted On: 23 OCT 2020 10:02PM by PIB Mumbai

 

दिनांक 04/10/2020,  रोजी झालेल्या नागरी सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2020 च्या निकालाच्या आधारे खालील  क्रमांक असणारे उमेदवार नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, २०२० साठी  प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत.

या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. परीक्षेच्या नियमांनुसार या सर्व उमेदवारांना नागरी सेवा  (मुख्य) परीक्षा, २०२० च्या सविस्तर अर्ज Form-I (DAF-I) मध्ये पुन्हा अर्ज करावा लागेल, जो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर (https://upsconline.nic.in) 28/10/2020 ते  11/11/2020 पर्यंत संध्याकाळी 6:00 पर्यंत उपलब्ध असेल.  सर्व पात्र उमेदवारांना डीएएफ -1 ऑनलाईन भरण्याची आणि शुक्रवार दिनांक 08/01/2021 रोजी घेण्यात येणा-या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 मध्ये प्रवेश घेण्यासाठी तो  ऑनलाईन सादर करण्याची सूचना करण्यात येत आहे. डीएएफ -1 भरण्यासाठी आणि तो सादर करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ज्या उमेदवारांना यशस्वी घोषित केले गेले आहे त्यांनी ऑनलाईन डीएएफ -1 भरण्यापूर्वी प्रथम वरील संकेतस्थळाच्या संबंधित पृष्ठावर नोंदणी करावी.

हे लक्षात घ्यावे की फक्त DAF‑I  सादर करणे म्हणजे प्रत्यक्षात उमेदवारांना नागरी सेवा  (मुख्य) परीक्षा, २०२० मध्ये प्रवेश घेण्याचा कोणताही अधिकार देत नाही. ई-प्रवेश पत्र या परीक्षेच्या वेळापत्रकासह पात्र उमेदवारांसाठी परीक्षा सुरू होण्याच्या 3‑4  आठवड्यांपूर्वी आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल. डीएएफ-१ सादर केल्यानंतर  टपाल पत्त्यात किंवा ईमेल पत्त्यात किंवा मोबाइल क्रमांकामधील बदल, एकाचवेळी आयोगाला कळवता येतील.

सीएस (पी) परीक्षा, २०२० च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या चाचणीचे गुण, कट ऑफ  गुण आणि  उत्तर  आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजेच https://upsc.gov.in  वर नागरी सेवा परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेनंतरच अपलोड केले जातील, अशी माहिती  देण्यात येत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे  धौलपूर हाऊस, शाहजहां रोड, नवी दिल्ली येथील त्याच्या संकुलातील  परीक्षा हॉल इमारतीजवळ एक सुविधा केंद्र आहे. उमेदवार वर नमूद केलेल्या परीक्षेच्या निकालासंदर्भात कोणतीही माहिती / स्पष्टीकरण सकाळी  10.00 ते संध्याकाळी  5.00 वाजे दरम्यान किंवा वैयक्तिकरित्या दूरध्वनीवर सुविधा काउंटरवरून 011-23385271, 011-23098543 किंवा 011-23381125.प्राप्त करू शकतात

निकालासाठी येथे क्लिक करा:

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1667183) Visitor Counter : 196