रसायन आणि खते मंत्रालय
गुवाहाटी, हैदराबाद आणि एस.ए.एस. नगर (मोहाली) येथील एनआयपीईआर यांनी वैद्यकीय उपकरणांमधील नवीन एम.टेक कार्यक्रम सुरु केला असून 22 ऑक्टोबर 2020 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू
Posted On:
23 OCT 2020 7:49PM by PIB Mumbai
वैद्यकीय उपकरणे ही जागतिक स्तरावर वाढत्या वैद्यकीय गरजा पूर्ण करणारे विज्ञानाचे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे. नवीन तंत्रज्ञानाची निरंतर गरज, सुधारणा आणि विकास कायम राखण्यासाठी या उदयोन्मुख क्षेत्रात प्रशिक्षित लोकांची मागणी वाढत आहे. प्रशिक्षित व्यावसायिक तयार करण्यासाठी, गुवाहाटी, हैदराबाद आणि एस.ए.एस. नगर (मोहाली) या तीन एनआयपीईआरनी वैद्यकीय उपकरणांमधील नवीन एम.टेक कार्यक्रम सुरु केला आहे.
वैद्यकीय उपकरणे विकसित करण्यासाठी आवश्यक जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, क्लिनिकल विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयांचा समावेश करण्याच्या दृष्टीने याची रचना आखण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात विविध वैद्यकीय उपकरणांचे नमुने विकसित करण्याच्या उद्देशाने एक वर्षाच्या प्रकल्प कार्याचा समावेश असेल. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांसाठी किमान पात्रतेचा निकष बी.फार्म, फार्म डी/ एमएससी/ बीटेक/ बीई/ एमबी.बी.एस/ बीडीएस/ बीव्हीएसएससी आहे.
अभ्यासक्रमासाठी तुकडीमध्ये प्रत्येक एनआयपीईआर (एनआयपीईआर-हैदराबाद, एनआयपीईआर-गुवाहाटी आणि एनआयपीईआर-एस. एस. नगर) मध्ये दर वर्षी 10 विद्यार्थी असतील.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा, औषधनिर्माणशास्त्र, जैव तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उपकरणे उद्योगात संशोधन आणि विकास तसेच वैद्यकीय उपकरणांच्या विविध क्षेत्रातील स्टार्ट-अप कंपन्या सुरू करण्यासारखे करियर पर्याय उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या तारखा: -
ऑनलाईन नोंदणी सुरू होण्याची तारीख - 22 ऑक्टोबर 2020
ऑनलाइन नोंदणीसाठी शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2020
ऑनलाईन एनआयपीईआर संयुक्त प्रवेश परीक्षा - 4 डिसेंबर 2020
संपूर्ण माहितीसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या: -
वेबसाइट: http://www.niperhyd.ac.in
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667129)
अभ्यागत कक्ष : 156