नागरी उड्डाण मंत्रालय

उडान योजना शाश्वत होण्यासाठी प्रयत्न करा: प्रदीप सिंग खरोला


50 नवीन त्याचबरोबर कमी क्षमतेची सेवा सुरु असणारे विमानतळ उडानमुळे जोडले गेले

RCS-UDANचा चौथा वर्धापनदिन

उडान दिन साजरा

Posted On: 21 OCT 2020 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020

UDAN योजनेची कार्यक्षमता सिद्ध होउन तिची वाटचाल शाश्वत व्हावी यासाठी सर्व संबधितांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन नागरी उड्डाण सचिव प्रदीप सिंग खरोला यांनी केले. व्हिडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजचा उडान दिन साजरा झाला तेव्हा ते बोलत होते. सामान्यांसाठी विशेषतः दूरवरच्या प्रवासासाठी विमानप्रवासाचे महत्व उडानने अधोरेखित केले, असे ते म्हणाले. अविरत प्रयत्नांती उडान योजना यशस्वी केल्याबद्दल सर्व संबधितांचे आणि उडाण टीमचे त्यांनी अभिनंदन केले. जास्तीत जास्त लोकांना उडान योजनेचा लाभ घेता यावा म्हणून मार्केटिंग स्ट्रॅटेजी राबवण्याचे आवाहन त्यांनी विमान कंपन्यांना केले. AAI, DGCA, MoCA व विमान कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या व्हिडीयो कॉन्फरन्सला उपस्थित होते.

विविध संस्थांनी एकत्र काम करून या योजनेच्या यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे या योजनेचं एक वैशिष्ठ्य आहे. उडानमुळे राष्ट्रीय पातळीवर विमानमार्गाचे जाळे तयार झाले, यातूनच भविष्यात देशभरातील लोकांच्या मागणीप्रमाणे, त्यांच्या गरजांनुसार स्थानिक विमानमार्गांचे जाळे विणले जाईल, असे त्यांनी नमूद केले.   उडान योजनेसाठी देशभरात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण(AAI) कटीबद्ध आहे असे प्रधिकरणाचे अध्यक्ष अरविंद सिंग यांनी स्पष्ट केले.

नागरी उड्डाण संयुक्त सचिव उषा पाधी यांनी उडान योजना यशस्वी करण्यासाठी सर्व संबधितांनी घेतलेले परिश्रम आणि सहकार्य यासाठी सर्व संबधितांचे आभार मानले. उडान योजनेची प्राथमिकता ओळखून भारत सरकारने 21 ऑक्टोबर (उडान योजना कागदोपत्री जारी केली गेली तो दिवस) उडान दिन म्हणून जाहीर केला असे त्यांनी सांगितले.

RCS-UDAN, ‘उडे देश का आम नागरिक’ हा स्थानिक पातळीवरील प्रवासासाठी किफायतशीर आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून देण्याचा उद्देश असलेला भारत सरकारचा महत्वाचा उपक्रम आहे.  स्थानिक ठिकाणे जोडणाऱ्या या (कनेक्टीव्हिटी) योजनेने सर्वसामान्य माणसाला किफायतशीर दरात विमानप्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला.  देशाच्या विमानप्रवासाच्या नकाशावर नवे विमानतळ आणि विमानमार्ग आखले जाण्यात उडानचा मोठा वाटा आहे.  उडानमुळे देशभरात  50 नवीन  व सध्या कमी क्षमतेची सेवा सुरु असलेले विमानतळ (5 हेलिपोर्ट्ससह ) तसेच 285 विमानमार्ग आखले गेले. योजनेची अंमलबजावणी करणारी संस्था या दृष्टीने भारतीय विमानतळ प्राधिकरणाची 2024 पर्यंत किमान 100 विमानतळ/वॉटरड्रोम्स/हेलीपोर्टस उभारण्याची महत्वाकांक्षी योजना आहे.

 

 

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666528) Visitor Counter : 228