रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नितीन गडकरींच्या हस्ते उद्या आसाममध्ये देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी

प्रविष्टि तिथि: 19 OCT 2020 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2020

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी उद्या देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची आसाममध्ये आभासी पद्धतीने पायाभरणी करणार आहेत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जनरल (सेवानिवृत्त) डॉ. व्ही के सिंग आणि रामेश्वर तेली, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.

693.97 कोटी रुपयांचा हा प्रकल्प लोकांना हवाई, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाशी थेट जोडणी उपलब्ध करून देणार आहे. केंद्र  सरकारच्या महत्वाकांक्षी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत हे मल्टी-मोडल पार्क विकसित केले जाईल.


* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1665883) आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Odia , Tamil , Telugu , Malayalam