विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

स्वयंसेवी संस्था तसेच समाजाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक क्षमता मजबूत करण्यासाठी सायन्स-सोसायटी-सेतू वेबिनार मालिका


वेब क्लिनिकमध्ये चार व्यापक क्षेत्रांचा समावेश; कृषी आणि संबंधित क्षेत्रे, सूक्ष्म, लघू- मध्यम उद्योग आणि आर्थिक क्षेत्र, सामाजिक पायाभूत सुविधा आणि त्यासंबंधित इतर क्षेत्रांचा समावेश

Posted On: 17 OCT 2020 8:31PM by PIB Mumbai

 

आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी समाजातल्या विविध घटकांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करून सायन्स-सोसायटी-सेतू या वेबमालिकेच्या निर्मितीमागची भूमिका विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी आज स्पष्ट केली.

आपल्याकडे असलेले ज्ञान त्याची प्रासंगिकता, त्या माहिती-ज्ञानाचे निर्माते आणि त्याचा उपयोग नेमका कसा करणे आवश्यक आहे. याविषयी सर्वांना स्पष्टता असणे गरजेचे आहे, असे सांगून प्रा. आशुतोष शर्मा यांनी समाजापर्यंत ज्ञान पोहोचविण्यासाठी वेब क्लिनिक या मालिकेला प्रारंभ केला.

आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी ‘वोकल फाॅर लोकल’ ला अधिक बळकटी देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने वेगवेगळ्या विभागाच्या सहकार्याने या वेबमालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना पोर्टल, डब्ल्यू डब्ल्यू एफ-भारत, अग्नि, फिक्की आणि एचईएससीओ आदि सहभागी झाले आहेत. या सर्वांच्या सहभागाने कृषी आणि संबंधित, सूक्ष्म, लघू- मध्यम उद्योग आणि आर्थिक , सामाजिक पायाभूत सुविधा आणि त्यासंबंधित इतर, अशा व्यापक चार क्षेत्रांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा कशा पद्धतीने उपयोग होवू शकतो, याची माहिती वेबमालिकेमध्ये देण्यात येणार आहे.

कोणतेही ज्ञान म्हणजे, जलवाहिनीमधून वाहणा-या, पुढे जाणा-या पाण्यासारखे आहे, असे प्रा. आशुतोष शर्मा यांनी सांगून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने स्वयंसेवी संस्थांनी अशा जलवाहिनीप्रमाणे कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.

नवीन शोध आणि ज्ञान यांचे रूपांतर सामाजिक-आर्थिक विकासासाठी करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे देशाला स्वावलंबी बनविणे शक्य होते. यासाठी स्वयंसेवी संस्था आणि समाजाने पुढे आले पाहिजे. शाश्वत ज्ञानाच्या मदतीने पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. तसेच स्वयंसेवी संस्था आणि समाज एकत्रित आल्यानंतर देशाला स्वावलंबी बनणे सहज शक्य होईल, असेही प्रा. शर्मा यावेळी म्हणाले.

यावेळी कृषी विभागाचे डॉ. के.के सिंह यांनी कृषी सेवा,  ग्रामीण तंत्रज्ञान कृती गटाचे समन्वयक प्रा. पी बी.एस. भदोरिया यांनी ग्रामीण तंत्रज्ञान, एमएनसीएफसीचे संचालक डॉ. एस.एस. रॉय यांनी उपग्रहामार्फत दूरनियंत्रण कृषी तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा केली. यावेळी जलसंवर्धन, उपग्रह तंत्रज्ञानाचा कृषी पुरवठा साखळीमध्ये वापर, लहान प्रमाणात शेती करताना यंत्राचा वापर याविषयी माहिती देण्यात आली तसेच तज्ज्ञांनी चर्चा केली.

 

-------

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665555) Visitor Counter : 149