सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

MSME निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या अनधिकृत आणि फसव्या कृत्यांबद्दल लोकांना सावधगिरीचा MSME मंत्रालयाचा इशारा


ही संस्था स्वतःला मंत्रालयाशी संबधित म्हणवून घेत असल्याच्या गैरवर्तणूकीची मंत्रालयाकडून गंभीर दखल

या संस्थेकडून मंत्रालयाच्या अधिकारात नियुक्ती प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मंत्रालयाचा संबध नसल्याचे स्पष्टीकरण

प्रविष्टि तिथि: 17 OCT 2020 3:46PM by PIB Mumbai

 

प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमध्ये MSME निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या संचालक पदासाठी नियुक्तीपत्र दिल्यासंदर्भात काही संदेश पसरवले जात आहेत, असे भारताच्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाने निदर्शनास आणले आहे. ही संस्था सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे नावाचा गैरवापर करत आहे.

MSME निर्यात प्रोत्साहन परिषद ही संस्था भारताच्या  सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाशी कोणत्याही प्रकारे संबधित नाही, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय  या परिषदेशी संबधित कोणत्याही नियुक्त्या MSME मंत्रालयाने अधिकृत ठरवलेल्या नाहीत. याद्वारे नागरिकांना सुचित करण्यात येते की अश्या प्रकारच्या कोणत्याही फसव्या संदेशांना वा गैरवर्तणुकीला बळी पडू नये.

*****

R.Tidke/V.Sahajrao /P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1665468) आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Tamil , Telugu , Malayalam