संरक्षण मंत्रालय

उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एसके सैनी यांचा अमेरिका दौरा

Posted On: 16 OCT 2020 1:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2020


उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एसके सैनी, 17 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. दोन्ही सैन्यामधील सैन्य सहकार्य वाढविणे हे या भेटीचे उद्दीष्ट आहे.

उपलष्करप्रमुख आपल्या दौऱ्यादरम्यान, यूएस आर्मी पॅसिफिक कमांड (यूएसएआरपीएआरएसी), द आर्मी कॉम्पोनंट ऑफ इंडो-पॅसिफिक कमांड येथे भेट देतील. आणि अमेरिकन सैन्याच्या प्रशिक्षण आणि क्षमतांबरोबरच लष्कर नेतृत्त्वासोबत विस्तृतपणे विचारांची देवाणघेवाण करतील. नंतर उपलष्करप्रमुख इंडोपाकॉमला भेट देतील. तेथे सैन्य सहकार्य आणि लष्कर ते लष्कर समन्वय, सैन्य प्रशिक्षण, संयुक्त सराव आणि क्षमता विकास यासह विविध पैलूंवर चर्चा केली जाईल.

या भेटीमुळे दोन्ही सैन्यांत विविध पातळ्यांवरील सहकार्यात आणखी वाढ होईल. कोविड-19 निर्बंध असूनही भारत, अमेरिकेसमवेत दोन संयुक्त सरावात भाग घेत आहे, यावर भर देण्यात आला आहे. युध्द अभ्यास (फेब्रुवारी 2021) आणि वज्र प्रहार (मार्च 2021) असे हे दोन सराव आहेत.

 

* * *

U.Ujgare/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1665074) Visitor Counter : 152