आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्राच्यावतीने केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्‍ये उच्चस्तरीय केंद्रीय पथक


संक्रमण, दक्षता, चाचणी, संसर्ग प्रतिबंध आणि कार्यकुशल वैद्यकीय व्यवस्थापन बळकट करण्यासाठी केंद्रीय पथक मदत करणार

Posted On: 16 OCT 2020 1:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2020

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उच्चस्तरीय केंद्रीय समूह नियुक्त करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या पाच राज्यांमध्ये कोविड रूग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आली आहे, त्याची कारणे शोधून उपाय योजना करण्यासाठी या समूहाची मदत होवू शकणार आहे.

या प्रत्येक समूहामध्ये संयुक्त सचिव (त्या त्या राज्यातले नोडल अधिकारी), एक सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेवू शकेल अशी तज्ज्ञ व्यक्ती, विषाणू प्रसार प्रतिबंधात्मक कारवाई करू शकेल, असा वैद्यकीय अधिकारी, तसेच राज्यामध्ये वैद्यकीय व्यवस्थापन मानक कार्यप्रणालीचे अवलंबन करणारा अधिकारी यांचा समावेश असणार आहे.

कोविड रूग्णसंख्येत वाढ झालेल्या या पाच राज्यांमध्ये संक्रमणाला आळा घालण्यासाठी कार्यवाही करणे, दक्षता घेणे, संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना  आणि ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करणे, वेळेवर निदान आणि पाठपुरावा करण्यामध्ये येत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय पथक मार्गदर्शन करणार आहे.

केरळमध्ये 3,17,929 जणांना कोरोना झाल्याची नोंद आहे. हे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 4.3 टक्के आहे. तर प्रतिदशलक्ष 8906 कोरोना रूग्णसंख्या आहे. केरळमध्ये बरे झालेल्या रूग्णांची संख्या 2,22, 231 आहे. बरे होण्याचे प्रमाण 69.90 टक्के आहे. तर सक्रिय रूग्णसंख्या 94,609 आहे. (एकूण राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 11.8 टक्के आहे.) केरळमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे 1089 जणांचा मृत्यू झाला. हे प्रमाण 0.34 टक्के आहे. तर प्रतिदशलक्ष मृत्यूदर 31 आहे. केरळचे टीपीएम म्हणजेच प्रतिदशलक्ष चाचणी प्रमाण 53518 असून त्यापैकी सक्रिय रूग्णदर 16.6 टक्के आहे.

कर्नाटकमध्ये 7,43,848 एकूण कोविड रूग्णांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आकडेवारीमध्ये हे प्रमाण 10.1 टक्के आहे. प्रतिदशलक्ष लोकसंख्येनुसार हे प्रमाण 11,010 आहे. राज्यातले 6,20,008 कोविडरूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.35 टक्के आहे. तर कर्नाटकमध्ये 1,13,557 सक्रिय रूग्णसंख्या आहे (राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 14.1 टक्के आहे.) कर्नाटकमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे 10,283 जणांचा मृत्यू झाला. हे प्रमाण 1.38 टक्के आहे. तर प्रतिदशलक्ष मृत्यूदर 152 आहे. कर्नाटकचे टीपीएम म्हणजेच प्रतिदशलक्ष चाचणी प्रमाण 95674  असून त्यापैकी सक्रिय रूग्णदर 11.5 टक्के आहे.

राजस्थानमध्ये 1,67,279 एकूण कोविड रूग्णांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आकडेवारीमध्ये हे प्रमाण 2.3 टक्के आहे. प्रतिदशलक्ष लोकसंख्येनुसार हे प्रमाण 2,064 आहे. राज्यातले 1,43,984  कोविडरूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.07 टक्के आहे. तर राजस्थानमध्ये सध्या 21,587  सक्रिय रूग्णसंख्या आहे (राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 2.7 टक्के आहे.) राजस्थानमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे 1,708 जणांचा मृत्यू झाला. हे प्रमाण 1.02 टक्के आहे. तर प्रतिदशलक्ष मृत्यूदर 21 आहे. राजस्थानचे टीपीएम म्हणजेच प्रतिदशलक्ष चाचणी प्रमाण 38,605  असून त्यापैकी सक्रिय रूग्णदर 5.3 टक्के आहे.

पश्चिम बंगालमध्ये 3,09,417 एकूण कोविड रूग्णांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आकडेवारीमध्ये हे प्रमाण 4.2 टक्के आहे. प्रतिदशलक्ष लोकसंख्येनुसार हे प्रमाण 3,106 आहे. राज्यातले 2,71,563 कोविडरूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.77 टक्के आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सध्या 31,984 सक्रिय रूग्ण आहेत (राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 4.0 टक्के आहे.) पश्चिम बंगालमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे 5,870 जणांचा मृत्यू झाला. हे प्रमाण 1.90 टक्के आहे. तर प्रतिदशलक्ष मृत्यूदर 59 आहे. पश्चिम बंगालचे टीपीएम म्हणजेच प्रतिदशलक्ष चाचणी प्रमाण 37,872 असून त्यापैकी सक्रिय रूग्णदर 8.2 टक्के आहे.

छत्तीसगडमध्ये 1,53,515 एकूण कोविड रूग्णांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आकडेवारीमध्ये हे प्रमाण 2.1 टक्के आहे. प्रतिदशलक्ष लोकसंख्येनुसार हे प्रमाण 5,215 आहे. राज्यातले 1,23,943 कोविडरूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.74 टक्के आहे. तर छत्तीसगडमध्ये सध्या 28,187 सक्रिय रूग्ण आहेत (राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 3.5 टक्के आहे.) छत्तीसगडमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे 1,385 जणांचा मृत्यू झाला. हे प्रमाण 0.90 टक्के आहे. तर प्रतिदशलक्ष मृत्यूदर 47 आहे. छत्तीसगडचे टीपीएम म्हणजेच प्रतिदशलक्ष चाचणी प्रमाण 50,191 असून त्यापैकी सक्रिय रूग्णदर 10.4 टक्के आहे.

कोविड प्रतिबंधासाठी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांची सरकारे एकत्रितपणे विविध उपाय योजना करीत आहेत. या प्रयत्नांना बळकटी आणण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने तज्ज्ञांचे पथक विविध राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना भेटी देवून वैद्यकीय आणि  संबंधित अधिका-यांशी संवाद साधून उपचार करण्यामध्ये तसेच व्यवस्थेमध्ये येणा-या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. समस्येच्या मूळाशी जावून ती सोडविण्याचे काम, हे केंद्रीय पथक करणार आहे.

 

* * *

U.Ujgare/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665072) Visitor Counter : 251