आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एफएसएसएआयच्या 'व्हिजन 2050' साठी 'सर्वसमावेशक सरकार' दृष्टीकोनाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आंतर-मंत्रालयीन बैठक

Posted On: 15 OCT 2020 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020

 

'इट राईट इंडिया' चळवळीचे ‘व्हिजन 2050’ साध्य करण्यासाठी ‘सर्वसमावेशक सरकार’ दृष्टिकोन तयार करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज एफएसएसएआय आणि विविध मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आंतर-मंत्रिस्तरीय बैठक पार पडली.

ईट राइट इंडिया आणि फिट इंडिया’ चळवळ देशाच्या आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. येत्या दहा वर्षांत त्याचे परिणाम आपल्या सर्वांना दिसतील असे ते म्हणाले. प्रणाली-आधारित दृष्टीकोन शाश्वत पद्धतींद्वारे पर्यावरणाची काळजी घेत सुरक्षित उपलब्धता,  योग्य आहाराला प्रोत्साहन यासोबतच अन्न सुरक्षा सुनिश्चित करतो.

भारतात दूषित अन्नामुळे होणाऱ्या आजारांवरील आर्थिक खर्चात सुमारे 15 अब्ज डॉलर इतकी वाढ होणं अपेक्षित आहे. अशाप्रकारे, अन्नसुरक्षेपासून पोषण सुरक्षेकडे जाण्यासाठी, ही मुख्य मंत्रालय एकत्र येऊन एका समान व्यासपीठाद्वारे उद्दीष्टे व कार्यनीती निश्चित करून त्यानुसार कृती करतील.

देशातील 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 50% लोकसंख्या निर्धारीत पौष्टीक आहारापासून वंचित आहेत, त्यामुळे ‘अन्न सुरक्षा ते पोषण सुरक्षा दृष्टीकोन’ अंगीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वेगवेगळे मंत्रालय प्राथमिक उत्पादन, अन्न प्रक्रिया, अन्नाचा अपव्यय यासंदर्भात त्यांचे नियमन आणि स्वच्छता आणि उपयोग या विषयावर गंभीर हस्तक्षेप करू शकतात. तरच ‘ईट राईट इंडिया’ ही चळवळ खऱ्या अर्थाने एक चळवळ बनेल, असे डॉ हर्षवर्धन म्हणाले.

विविध मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी चळवळीच्या उद्दीष्टांसंदर्भातील महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर घेतलेली आपली मते आणि कृती सादर केली.

आरोग्य विभागाचे सचिव आणि विविध मंत्रालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

 

S.Thakur/S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664804) Visitor Counter : 263