मंत्रिमंडळ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये क्षमता निर्माण, संशोधन आणि विकास तसेच प्रभावी शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी केलेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
14 OCT 2020 6:17PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या विविध क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. केंद्रीय भूजल मंडळ, जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण-स्वच्छता प्रकल्प आणि भूजल स्तराचे शाश्वत व्यवस्थापन करणे, भूमीअंतर्गत जलस्त्रोतांना पुन्हा पाझर आणण्यासाठी अगदी गावपातळीवर कार्य करणे, यासंबंधी ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर, 2019 मध्ये उभय देशामध्ये सामंजस्य करार करण्यात आले होते, त्यांना आज मान्यता देण्यात आली.
कृषी, नागरी, औद्योगिक आणि पर्यावरणासाठी जमिनीवरील आणि भूगर्भातील जलस्तर याविषयी प्रशिक्षण, शिक्षण तसेच संशोधन या क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उभय देशांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
----------
M.Chopade/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664429)
Visitor Counter : 150
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam