आयुष मंत्रालय
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या वतीने महात्मा गांधींचे स्मरण
Posted On:
12 OCT 2020 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020
आयुष्य मंत्रालया अंतर्गत असलेल्या एनआयएन अर्थात राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या वतीने महात्मा गांधीजींची 151 जयंती साजरी करण्यात आली.
एनआयएनने गांधी जयंतीवर 48 वेबिनारांची एक मोठी मालिका सुरू केली आहे. आरोग्य, अन्न आणि पोषण या विषयाबद्दल महात्मा गांधींच्या कल्पनांबद्दल जनजागृती करणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे. या मालिकेच्या पहिल्या आठवड्यात लोकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. यामध्ये गांधीवादी विचारांचा देखील समावेश होता, जे गांधींच्या काळात जितके उचित होते तितकेच आजही महत्त्वपूर्ण आणि उपयोगी आहेत.
एनआयएनच्या गांधी जयंती कार्यक्रमाची सुरूवात 2 ऑक्टोबर रोजी 'लिव्हिंग गांधी' स्मारकाच्या उद्घाटनानंतर झाली. या सोहळ्याचे उद्घाटन ऑल इंडिया नेचर क्युर फाउंडेशन ट्रस्ट, सोसायटी ऑफ सर्व्हंट्स ऑफ गॉड चे सदस्य लाल घनशानी यांच्या हस्ते झाले. ते एन.आय.एन. पुणे च्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य आहेत. एनआयएनच्या गांधी प्रार्थना मंच येथे प्रादेशिक आउटरीच ब्युरोच्या (महाराष्ट्र व गोवा) च्या पथकाने भावांजली गाऊन बापूजींना श्रद्धांजली वाहिली. एनआयएन आयोजित योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.
गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव येथील प्रा. गीता धरमपाल यांनी 3 ऑक्टोबरला गांधीजींच्या उपचारविषयक प्रभावाविषयी माहिती दिली. 4 ऑक्टोबर रोजी सामाजिक विज्ञान संस्था, नवी दिल्लीचे डॉ. जॉर्ज मॅथ्यू यांनी गांधीजी, ग्राम स्वराज आणि ग्राम आरोग्य याविषयी माहिती दिली. प्रख्यात संरक्षक निखिल लांजेवार यांनी 5 ऑक्टोबर रोजी गांधीजींच्या दयाभाव जीवनशैली संकल्पनेबद्दल भाष्य केले. 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध कॉर्पोरेट शेफ निशांत चौबे यांनी 21 व्या शतकातील गांधीवादी भोजनाबद्दल काही रोचक दृष्टीकोन सामायिक केला.
8 ऑक्टोबर रोजी, भारतीय विद्या भवन ऑस्ट्रेलियाच्या गंभीर वत्स यांनी अहिंसा आणि कल्याण यामधील फरक स्पष्ट करताना गांधीजींच्या नेतृत्वात असलेल्या प्रमुख चळवळींबद्दल स्पष्टीकरण दिले.
वेबिनारची दैनंदिन मालिका 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे आणि 21 व्या शतकादरम्यान सर्वसाधारणपणे जीवन आणि आरोग्याच्या क्षेत्रात महात्मा गांधींच्या वारसाच्या प्रासंगिकतेवर जोर दिला जाईल.
आयुष मंत्रालय, https://www.facebook.com/watch/punenin/ या लिंक द्वारे, गांधीवादी विचार आणि त्यांच्या मतांबद्दलच्या या वैविध्यपूर्ण बौद्धिक कार्यक्रमात सर्वांना सहभागी होण्याचे आमंत्रण करत आहे.
* * *
R.Tidke/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663786)
Visitor Counter : 215