उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींची कोविड-19 चाचणी निगेटीव्ह, लवकरच दैनंदिन कार्याला सुरुवात करणार

Posted On: 12 OCT 2020 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020

 

उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांची आज कोविड-19 चाचणी निगेटीव्ह आली आहे. कोविड-19 संक्रमणाचा संसर्ग झाल्यानंतर 29 सप्टेंबरपासून ते गृहविलगीकरणात होते.

आज एम्सच्या वैद्यकीय चमूने उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी श्रीमती उषा नायडू यांची केलेली कोविड-19 आरटी-पीसीआर चाचणी निगेटीव्ह आली आहे.  

उपराष्ट्रपती नायडू यांची तब्येत चांगली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते लवकरच दैनंदिन कार्य सुरु करतील. आरोग्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

 

* * *

M.Iyengar/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1663736) Visitor Counter : 148