रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारतमाला परियोजनेअंतर्गत 2921किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम पूर्ण;322 प्रकल्पात 12,413 किलोमीटर कामांचे वाटप
Posted On:
11 OCT 2020 4:15PM by PIB Mumbai
भारतमाला परीयोजनेंतर्गत ऑगस्ट 2020 पर्यंत 322 प्रकल्पांना 12,413 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या बांधकामाचे वाटप करण्यात आले असुन, आतापर्यंत 2931 किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
रस्ते परीवहन आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्यांचे तपशीलवार पुनरावलोकन केले आणि भारतमाला परीयोजनेच्या पहिल्या टप्प्यातील योजनेसाठी 34,800 किलोमीटर रस्त्यांच्या (ज्यात10,000 किमीचे राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतील उर्वरित क्षेत्र समाविष्ट आहे)एकूण गुंतवणूकीला मान्यता दिली होती,ज्याची अंदाजे किंमत 5,35,000 कोटी रुपये इतकी होती.
भारतमाला परीयोजना, ही महामार्ग आणि रस्ते निर्माण क्षेत्रातील महत्वाची योजना असून, देशभरातील मुख्य आर्थिक जोडमार्ग,अंतर्गत जोडमार्ग ,प्रमुख मार्ग,राष्ट्रीय महामार्ग दक्षता सुधारणा,देशाच्या सीमा आणि इतर देशांना जोडणारे जोडमार्ग ,किनारे आणि बंदरांना जोडणारे मार्ग ,तसेच हरीत क्षेत्र एक्सप्रेस मार्गांचा विकास करण्यासाठी अनुकूल कार्यक्षम योजना असून, अशा प्रभावी योजनांच्या माध्यमातून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक यांची नेआण सुरळीतपणे करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हे त्याचे लक्ष्य आहे.
**
B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663521)
Visitor Counter : 252
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam