आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात 60 लाख कोविड रुग्ण बरे होण्याचा मैलाचा टप्पा


सलग 8 दिवस 1000 पेक्षा कमी मृत्यूची नोंद

बरे झालेले अर्ध्याहून अधिक रुग्ण पाच सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यातले

Posted On: 11 OCT 2020 3:44PM by PIB Mumbai

 

भारताने आज आणखी एक मैलाचा टप्पा गाठला. देशात कोविडमधून  बरे झालेल्यांची एकूण संख्या 60 लाखांहून अधिक (60,77,976 ) झाली आहे.

दररोज मोठ्या संख्येने कोविड रुग्ण बरे होत असून उच्च संख्येने रुग्ण बरे होण्याचा  कल कायम आहे. देशात गेल्या 24 तासात 89, 154 रुग्ण बरे झाले आहेत.

WhatsApp Image 2020-10-11 at 10.30.05 AM.jpeg

देशभरात  वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, राज्ये आणि  केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या प्रमाणित उपचार प्रोटोकॉलची अंमलबजावणी आणि डॉक्टर, निमवैद्यकीय  आणि आघाडीवर काम करणाऱ्यांची समर्पित वृत्ती तसेच  वचनबद्धता यामुळे दैनंदिन मृत्यूच्या संख्येत सातत्याने घसरण झाली असून  बरे होणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने  वाढ दिसून आली आहे.

गेले  सलग आठ दिवस  नवीन मृत्यूची नोंद 1000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे. देशात गेल्या 24  तासात 918 मृत्यूंची  नोंद झाली.

WhatsApp Image 2020-10-11 at 10.29.29 AM.jpeg

देशातली सक्रिय रुग्णांची संख्या 8,67,496 आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतली घट कायम असून गेल्या तीन दिवसात ती 8 लाखांपेक्षा कमी आहे.

WhatsApp Image 2020-10-11 at 10.30.06 AM.jpeg

कोविडमधून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आणखी वाढून तो 86. 17 % झाला आहे.

रुग्ण बरे होण्याच्या वाढत्या संख्येबरोबरच जगात सर्वाधिक संख्येने  रुग्ण बरे होण्यातले अव्वल स्थान भारताने कायम राखले आहे.

बरे झालेल्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण(54.%), सर्वाधिक रुग्णसंख्या (सक्रिय रुग्णांपैकी 61%) असलेल्या 5 राज्यांमधले आहेत.

WhatsApp Image 2020-10-11 at 10.32.48 AM.jpeg

 बरे झालेल्या रुग्णांच्या नव्या नोंदींपैकी  80% हे महाराष्ट्र, कर्नाटक,केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू , उत्तर प्रदेश, ओडिशा,पश्चिम बंगाल,दिल्ली आणि चंदिगड या 10 राज्यांमधले आहेत.

यात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून काल 26 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली.

WhatsApp Image 2020-10-11 at 10.29.25 AM.jpeg

देशात गेल्या 24 तासात 74,383 नव्या रुग्णांची पुष्टी झाली.

नव्या रुग्णांपैकी 80% रुग्ण 10 राज्ये /केंद्रशासित प्रदेशातील आहे. केरळमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक आहे.  या दोन्ही राज्यांमध्ये 11,000 हून  अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली.

WhatsApp Image 2020-10-11 at 10.29.24 AM.jpeg

 

गेल्या 24 तासात 918 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 84% मृत्यू हे 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

 एकूण मृत्यूंपैकी 33% मृत्यू  महाराष्ट्रातले असून  काल महाराष्ट्रात 308 मृत्यू  झाले.  त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 102 मृत्यू झाले.

WhatsApp Image 2020-10-11 at 10.29.22 AM.jpeg

 

****

B.Gokhale/S.Kakde/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663518) Visitor Counter : 149