भारतीय निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांच्या नोंदणीसाठी सार्वजनिक सूचना कार्यकालामध्ये सवलत
Posted On:
09 OCT 2020 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2020
ज्या राजकीय पक्षांनी दि. 7 ऑक्टोबर,2020 रोजी अथवा त्यापूर्वी सात दिवसांच्या आत आपली सार्वजनिक सूचना प्रकाशित केली आहे, त्यांना निवडणूक आयोगाने कार्यकाळामध्ये सवलत देवून हा काळ कमी केला आहे. आधी अशा नोटिसीसाठी 30 दिवसांचा कार्यकाळ दिलेला होता. विशेष म्हणजे दि. 10 ऑक्टोबर, 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सूचना प्रकाशित करणा-या पक्षांनासुद्धा ही सवलत देण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा दि. 25 सप्टेंबर, 2020 रोजी केली होती. सध्या कोविड-19 महामारीचा उद्रेक सर्वत्र आहे, अशा वेळी सर्वांनाच राजकीय पक्षाच्या सार्वजनिक सूचनेसाठी आवश्यक कार्यवाहीची पूर्तता करणे आणि नोंदणी करणे शक्य होणार नाही. यासंबंधीच्या सर्व पैलूंचा विचार करून, निवडणूक आयोगाने पक्षाच्या सार्वजनिक सूचनेचा कार्यकाळ 30 दिवस न ठेवता तो कमी करून सात दिवसांचा केला आहे. ही सवलत बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यासाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजे दि. 20 ऑक्टोबर, 2020 पर्यंत लागू असणार आहे.
राजकीय पक्षांची नोंदणी लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951, कलम 29- अ यामधील तरतुदींनुसार करण्यात येते. नोंदणी करू इच्छिणा-या पक्षाला त्या कलमामधील तरतुदीनसार आपल्या पक्षाची राजकीय नोंदणी करण्यासाठी भारतीय घटनेतल्या अनुच्छेद 324 आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 29 -अ मध्ये नमूद केलेल्या हक्कांचा उपयोग करून आयोगाच्यावतीने निर्धारित दिशा निर्देशांनुसार आपला पक्ष स्थापन केल्यानंतर 30 दिवसांच्या आत आयोगाकडे निवेदन सादर करावे लागते.
सध्याच्या दिशानिर्देशानुसार निवेदन सादरकर्ता आयोगाकडे प्रस्तावित पक्षाच्या नोंदणीसाठी सार्वजनिक सूचनेच्या प्रकाशनाच्या 30 दिवसांच्या आत जर काही आपत्ती असेल,तर सांगावी लागते. तसेच नोंदणी प्रस्ताव सादर करण्यासाठी नवीन पक्षाचे नाव दोन दिवस दोन वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरील आणि स्थानिक पातळीवरील दैनिक वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करण्यास सांगण्यात येते. अशाच प्रकारची सूचना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही प्रदर्शित केली जाते.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663122)
Visitor Counter : 288