गृह मंत्रालय

दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली भेट


राम विलास पासवान यांचे सामाजिक कार्य आणि मृदू स्वभाव यामुळे ते कायम स्मरणात राहतील - केंद्रीय गृहमंत्री

Posted On: 09 OCT 2020 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2020


दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पासवान यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी आज भेट दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ज्येष्ठ केंद्रीय मंत्री राम विलास पासवानजी यांना श्रद्धांजली वाहिली. पासवानजी त्यांच्या मृदू स्वभाव आणि लोक कल्याणाशी संबंधित असलेल्या कामासाठी कायम स्मरणात राहतील. त्याच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो.”

 

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663107) Visitor Counter : 71